भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्यावर एट्रोसिटी दाखल

ठाणे : फुफानी कंपाऊंड, डोंगरीपाडा किंककाँग नगर येथे स्वप्नाली अशोक सोनावले यांचे घर आहे. हे घर त्यांनी भाडेतत्त्वावर दिले आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये भाडेकरूचा करारनामा संपल्यानंतर स्वप्नाली सोनावले या घराचा ताबा घेण्यासाठी गेल्या असता, संबधित भाडेकरूने घराचा ताबा सोडण्यास नकार दिला. तसेच, हे घर मनोहर डुंबरे यांनी दहा लाखाला विकले असल्याचे सांगितले. यासंदर्भात भाडेकरूने डुंबरे यांच्याशी स्वप्नाली यांचे फोनवर बोलणे करून दिले. मात्र, जुजबी बोलून डुंबरे यांनी फोन बंद केला. त्यामुळे स्वप्नाली सोनावले यांनी पुन्हा डुंबरे यांना फोन केला असता, हे घर माझे आहे.

तुम्ही कोण आहात? मी इथला नगरसेवक असून माझी मालकी आहे, असे म्हणत डुंबरे यांनी स्वप्नाली सोनावले यांना जातीवाचक शिविगाळ केली होती. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र, पोलिसांनी कारवाई न केल्याने स्वप्नाली सोनावले यांनी न्यायालयात 156 (3) नुसार याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना 9 जुलै रोजी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार कासारवडवली पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 (अ) , 3 (1)(4) आणि 3 (1) (9) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

× How can I help you?