पालावरच्या बिरदेवा लका तू साहेब झालास..! 

पालावरच्या बिरदेवा लका तू साहेब झालास..! (२४ एप्रिल २०२५) *”अभिनंदन बिरदेवा!” बिरदेव सिध्दाप्पा डोने, मौजे यमगे ता. कागल जि. कोल्हापूर ! पालावरच्या धनगर समाजातील “सिध्दाप्पा” मेंढपाळाचं लेकरू union public service commission भारतीय लोकसेवा आयोग, UPSC परीक्षेत ५५१ रॅंक अर्थात civil services examination नागरी सेवा परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे क्रमवारीकरण पटकावून यश मिळवलं त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! कठोर परिश्रम आणि सातत्य ठेवून बापाची इच्छा पूर्ण केलीस, लका तुझ्या जिद्दीला सलाम! युवानों,भावांनो, भगिनींनो ,हे केवळ व्हाट्सअप ग्रुपवरचं मनोरंजन नसून ,पालावरचं लेकरू मेंढरं हाकत केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा देवून नुसता उत्तीर्ण नाही तर “बिरदेवा” आज तुमचा आयकॉन झालाय.!प्रचंड मेहनत, आत्मविश्वास व जिद्दीची एक जिवंत प्रेरणा म्हणजे “बिरदेवा” होय. खडतर परिस्थितीत मोठे स्वप्न पहाण्याची आणि ती सत्यात उतरण्याची ताकद बिरदेव डोने यांनी दाखवून दिली. परिस्थिती कसलीही असो स्वप्न मोठी असतील तर त्याच्या मागे धावण्याचे बळ स्वतःच निर्माण करावं लागतं.मग जिद्दीला हरवणं अशक्य असतं. “बिरदेवा”, यमगे विद्यामंदिर व जय महाराष्ट्र विद्यालय यमगे येथून शिक्षण घेतल्यानंतर मुरगुडचे शिवाजी विद्यालय गाठलेस.?‌ पुण्याच्या COEP सीओईपी इंजिनिअरिंग महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर,बिरदेवा स्पर्धा परीक्षेसाठी दिल्ली गाठली. आज काही जण मुजरा करण्यासाठी दिल्ली गाठतात असे ऐकून आहे.बिरदेवा यासाठी दिवसातील २४ तास अभ्यासासाठी घालवलेस.! महिन्याला दहा हजार रुपये खर्च झेपणार नाही म्हणून सिध्दाप्पा बापानं शिक्षाण सोडं नौकरी कर.. म्हणून तगादा लावला.पण बिरदेवा तू आपलं लक्ष विचलित होऊ दिलं नाहीस.धनगर आरक्षणावर , जम्मू कश्मिर प्रश्नांवर उत्तरं दिलीस.? संविधानाच्या चौकटीत राहून सतत संवाद साधला तर प्रश्न सुटेल असं ठामपणे बोललास वास्तवातलं कटूसत्य ऐकताना सत्तापिपासू राजकारण्यांनी प्रश्नांची कशी गुंतागुंत केलीय हेच अधोरेखित होतय.! मेंढरं राखणं सोपं नाही तशा मीही शेळ्या सांभाळल्यात दिवसभर रानात भटकंती करावी लागतं शेतक-याच्या बांधावर शेरडू गेलं माय बहीणीचा उध्दार झाला म्हणून समजा आता गायरानाची जागांवरही झोपडपट्टया उभ्या राहिल्यात.! बिहरदेवा तूझा संघर्ष खरच सोपा नव्हता.Life is struggle meet it.! पण काय बी म्हण पालवरच्या बिरदेवा लका तू “साहेब”झालास.! जिंकलास वाघ्या .!भवतुं सब्बं मंगलम्!*@ *समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे महाराष्ट्र शासन ! +९३२४३६६७०९*

Leave a Comment

× How can I help you?