लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले.महायुती पंचेचाळीस प्लस सांगणारे बोलघेवडे नेते गायब झाले.आशिष शेलार तर राजकीय संन्यास घेणार होते.पण यांचे बॉस देवेंद्र फडणवीस मित्र उशिराने प्रकट झाले.आणि त्यांनी मानभावीप्रमाणे पराभवाची जबाबदारी स्वीकारली.राणा भीमदेवी थाटात संगितले की,आम्ही विधानसभेत व्याजासकट ऊट्टे काढू.वास्तविक पाहता हा अहंकार देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच शोभणारा होता.
देवेंद्र फडणवीस २०१९ ला आपले मुख्यमंत्रीपद गेले याचा सूड घ्यायच्या नादात,आपली ओळख गमावून बसले.जे मुख्यमंत्रीपद जाण्यापेक्षा जास्त नुकसान करणारे होते.
आता तर ते म्हणतात मला सरकारमधून बाहेर पडायला परवानगी द्या.मला पक्षसंघटनेत काम करायचे आहे.यातील महत्त्वाचे गोम अशी आहे की,
भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे.पक्षनेतृत्वाला त्यांची ही भूमिका बंद दाराआड सांगू शकले असते.पण त्यांनी हे जाहीरपणे सांगून नेमके काय साधले आहे?
एकतर त्यांना हे विद्यमान सरकार गळ्यात हाडूक अडकले आहे त्याप्रमाणे झाले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यशैली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा खूप वेगळी आहे.त्यात एकनाथ शिंदे यांचे गृहमंत्री अमित शाह यांच्याशी थेट अर्थपूर्ण चर्चा होतात.त्यामुळे बरेचसे निर्णय एकनाथ शिंदे आता परस्पर घेतात.किंबहुना एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत जागावाटपात केंद्रीय नेतृत्वाला पटवून पदरात पाडून घेतल्या.त्यात देवेंद्र फडणवीस याना विश्वासात घेतले गेले नाही.
ठाण्यात भाजपचे पदाधिकारी लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना दाद देत नव्हते. त्यावेळी त्यांना दम द्यायला दिल्लीहून राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आले होते.यातून एक नक्की लक्षात येते की,एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस याना समांतर यंत्रणा भाजपमधे निर्माण केली आहे.
देवेंद्र फडणसवीस यांच्या लक्षात आले आहे की,
लोकसभा निवडणुकीच्या निकालातून राज्य प्रशासन काय तो अन्वयार्थ काढेल.त्यामुळे येणाऱ्या चार-पाच होणाऱ्या विधानसभेच्या उर्वरित काळात,हवे तसे सहकार्य ब्युरोक्रासी करणार नाही.त्यात शिंदे-पवार यांच्यामुळे पुण्यातील एखादे पॉर्शे अपघात प्रकरण घडले.त्यामुळे आहे त्या प्रतिमेलासुद्धा तडा जाईल.
एकूणच देवेंद्र फडणवीस आत स्वतः सुरू केलेल्या या खेळातून बाहेर पडून,नामनिराळे होण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यातून विधानसभेला होणारी नाचक्की टाळता येईल.आता सूत्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गळ्यात मारण्याचा त्यांचा प्रयत्न राहिल.अन्यथा मला पक्षसंघटनेत काम करू द्या असे ते का म्हणतील?
भाजपच्या गावपातळीवर असलेला भाजपचा सक्रिय शेंबडा कार्यकर्ता सुद्धा सांगेल.महाराष्ट्र भाजपचे सूत्रधार कोण आहेत.तर ते आहेत देवेंद्र फडणवीस! मग आता अजून कुठल्या पक्षसंघटनेंत काम करणार हा एक प्रश्नच आहे.
एकूणच हा प्रवास आहे मी पुन्हा सत्तेत येईन ते मला सत्तेतून बाहेर पडू द्या.
अॅड. मनोज वैद्य
शिकारीची शिकार झाली..! मी पुन्हा येईन ते मला आता सरकारमधून मोकळे करा! एक फडणवीशी प्रवास…
Post Views: 921

Recent Posts
देवांनो ! तुम्ही सुद्धा!…
October 23, 2025
No Comments
पोलिस हुतात्मा दिन
October 21, 2025
No Comments
गोष्ट ॲक्वा लाईन ट्रेनची..
October 21, 2025
No Comments
एकल शिक्षकी शाळा : देशाच्या भविष्यापुढे प्रश्नचिन्ह
October 17, 2025
No Comments
डिएला : अल्बेनियाची पहिली एआय मंत्री
October 15, 2025
No Comments