आजही वर्णभेद सुरूच आहे…

तुमच्या दिसण्यावरून तुमची योग्यता ठरत नसते असे सर्वसाधारणपणे मानले जाते. मात्र, आजही तुम्ही कितीही उच्चपदावर पोहोचला असाल तरीही रंगभेदाचा सामना करावा लागतो. काळ्या रंगावरून एखाद्याची गुणवत्ता ठरवली जाते. असेच काहीसे केरळसारख्या जवळपास 100 टक्के साक्षरता दर असलेल्या प्रगत राज्याच्या मुख्य सचिव असलेल्या शारदा मुरलीधरन यांच्यासोबत घडले आहे.
भारतीय महिलांना आयुष्यभर त्यांच्या लूक्सबद्दल दुखावणान्या टीकांचा सामना करावा लागतो. तर वास्तव असे आहे की हजारो आणि लाखो महिलांनी त्यांच्या प्रतिभेने आणि संघर्षाने प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. केरळच्या मुख्य सचिव शारदा मुरलीधरन या त्यापैकी एक आहेत.

तिने सोशल मीडियावर सांगितले की, गेल्या 50 वर्षांपासून तिच्या त्वचेच्या रंगाबद्दल म्हणजेच तिच्या काळपट रंगाबद्दल किंवा काळवंडपणाबद्दल तिला अपमानास्पद टिप्पणी सहन करावी लागत आहे. या महिला अधिकायाची कहाणी ऐकल्यानंतर तुम्हालाही वाटेल की काळे रंग असणे गुन्हा आहे का?

शारदा मुरलीधरन यांची गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केरळच्या मुख्य सचिवपदी नियुक्त झाली. त्याआधी त्यांचे पती ही वेणु हे या पदावर होते, जे 31 ऑगस्ट 2024 रोजी निवृत्त झाले. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या रंगावर अनेक टिप्पण्या करण्यात आल्या. अलीकडेच एका युजरने फेसबुकवर त्यांच्या पती व त्यांच्या रंगाची तुलना करणारी कमेंट केली होती. शारदा यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, काल मुख्य सचिव म्हणून माझ्या कार्यकाळाबद्दल एक मजेशीर टिप्पणी ऐकली, ज्यात म्हटले की मी तितकीच काळी आहे जितका माझ्या पतीचा रंग गोरा आहे.

त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, लहानपणापासून त्यांना त्यांच्या रंगामुळे कमी समजले जात होते. मात्र, त्यांच्या मुलांनी काळा रंग देखील सुंदर असू शकतो हे पटवून दिले.

आपल्याला आधुनिक म्हणवून घेण्याचा अभिमान वाटेल, परंतु महिलांबद्दलचा, विशेषत त्यांच्या दिसण्याबद्दलचा विचार आजही बदललेला नाही. त्यांच्या यशाकडे दिसण्याच्या आणि रंगाच्या दृष्टिकोनातून पाहणे हे विकृत मानसिकतेचे लक्षण आहे. पतीच्या रंगावरून स्त्राrची किंमत मोजली जाते हे निराशाजनक आहे.

शारदा मुरलीधरन यांनी एखाद्याच्या अयोग्य आणि अप्रिय टिप्पणीला उत्तर देऊन पूर्वग्रहांवर टीका केली आहे. जरी त्यांनी आपले विचार शेअर केल्यानंतर सोशल मीडियावरील त्यांची पोस्ट डिलीट केली असली तरी, नंतर काही हितचिंतकांनी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी लिहिले की या विषयावर सामाजिक चर्चा झाली पाहिजे. सकारात्मक बाब म्हणजे रंगाच्या मुद्यावर शारदा यांनी दिलेल्या सविस्तर प्रतिसादाचे मोठ्या संख्येने

लोकांनी स्वागत केले आहे. यावरून असे दिसून येते की काही लोकांची विचारसरणी संकुचित असली तरी समाज बदलत आहे.
शारदा मुरलीधरन यांनी त्यांच्या बालपणीचा एक प्रसंग पुढे सांगितला. त्यांनी सांगितले की, वयाच्या चौथ्या वर्षी ती तिच्या आईला तिला पुन्हा गर्भाशयात टाकून ‘गोरी आणि सुंदर’ करून बाहेर काढण्याची विनंती करायची. पण आता त्यांचे विचार बदलले आहेत. त्या सांगतात, आता जेव्हा मी माझ्या मोठ्या मुलांच्या नजरेतून स्वतकडे पाहते तेव्हा मला काळा रंग आवडतो. आता मला काळा रंग आवडतो.

काळ्या रंगामुळे होणाऱ्या भेदभावाविरुद्ध कोणीतरी आवाज उठवण्याची ही पहिलीच वेळ नाही. आपल्या आजूबाजूला दररोज असंख्य लोक वंशवादाचा सामना करतात. वंशवाद ही प्रामुख्याने एक सामाजिक आणि सांस्कृतिक समस्या आहे, जी कायदेशीर क्षेत्राबाहेर, वैयक्तिक आणि समुदाय पातळीवर अस्तित्वात आहे. ‘गोरी वधू हवी आहे’ असे वाक्य विवाहाच्या जाहिरातींमध्ये आणि गोरी त्वचेला सौंदर्याशी जोडणाऱया चित्रपटांमध्ये सामान्य आहे. परंतु हे थांबवण्यासाठी कोणतेही ठोस कायदेशीर पाऊल उचलले गेले नाही. गोऱया लोकांना नोकरी, लग्न आणि सामाजिक स्वीकृती यामध्ये प्राधान्य दिले जाते. भारतात त्वचा पांढरी करणाऱया क्रीम्सची बाजारपेठ अब्जावधी रुपयांची आहे, ज्यामुळे गरीब लोकांवर अनावश्यक खर्चाचा भार पडतो.

शारदा मुरलीधरन यांची कहाणी भारतातील वर्णभेदाची तीव्रता अधोरेखित करते. उच्चपदस्थ अधिकायालाही या भेदभावाचा सामना करावा लागतो, यावरून ही समस्या किती व्यापक आणि खोलवर रुजलेली आहे हे दिसून येते. भारतात हे थांबवण्यासाठी कायदेशीर चौकट मजबूत करणे तसेच सामाजिक जागरूकता वाढवणे आवश्यक आहे. इतर देशांशी तुलना केल्यास असे दिसून येते की केवळ कायदा आणि शिक्षणच ते दूर करू शकतात. वंशवाद केवळ चुकीचाच नाही तर तो समाजात अनावश्यकपणे फूट पाडतो, जो प्रत्येक स्तरावर नष्ट करणे आवश्यक आहे.

शारदा मुरलीधरन यांच्या या पोस्टने केवळ रंगभेदाचा मुद्दाच अधोरेखित केला नाही तर समाजात खोलवर रुजलेल्या रंगभेदावर खुली चर्चा होण्याची गरजही अधोरेखित केली आहे. त्यांच्या या उपक्रमाला सोशल मीडियावर व्यापक पाठिंबा मिळत आहे आणि लोक याला एक धाडसी पाऊल म्हणत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतो की आपला समाज रंगाच्या आधारावर होणाऱया भेदभावाच्या पलीकडे गेला आहे का?

: मनीष वाघ

 

 

Leave a Comment

× How can I help you?