आपण बाबासाहेबांना काय दिलं?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात ओबीसी, कुणबी अनूसूचीत जाती-जमाती, भटक्यांना आरक्षण दिलं. बांधवानो, त्या बदल्यात आपण त्यांना काय दिलं? रात्री बाराच्या ठोक्याला साक्षात “मूकनायक” आपल्या वाड्या वस्त्यात येतोय.!  सातासमुद्रापार कोलंबिया विद्यापीठात, महासत्ता अमेरिकेत.!राजकीय फायदा उचलण्यासाठी उभ्या केलेल्या मंचावरही येतोय.!

१३४ वी जयंती जल्लोषात.MA.PHD, M.SC,D.SC, LL.B BAR AT LAW. SYMBOL OF KNOWLEDGE .! क्रांतिसूर्याला हमरस्त्यावर कोटी कोटी प्रणाम करण्याच्या आरंभाला मी वेगळ्या पद्धतीने व्यक्त होतोय, आत्मसन्मानाचं ऋण म्हणा की, सामाजिक उत्थानासाठी अहोरात्र धडपडणा-यांची संवेदना म्हणा. पण वास्तव मांडतोय नाही का?

प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उभ्या आयुष्यात शोषित समाजासाठी समताधिष्ठित भारतनिर्माणासाठी लढले . राजे महाराजांची केस लढले नाहीत .अगदी कायदे मंत्रीपदाचा राजिनामा दिल्यावर शासकीय निवासस्थानी राहिले नाहीत.२६ अलिपूर दिल्लीतील निवासस्थानात सुध्दा किमान भाडे भरीत राहिले.माझा देश सुखात रहावा, मातीत मळलेल्यांना उचलून घ्यावं म्हणून की काय? डॉ .आंबेडकर यांनी कुटुंबाला वेळ दिला नाही.स्वत:ची राजरत्न, इंदू रमेश, लेकरं दगावली तरीही कुटुंबियांकडे लक्ष नाही दिलं.परमप्रिय “रामू” अर्थात त्यागमूर्ती रमाई साठीही..!शेवटच्या श्वासापर्यंत डॉ. बाबासाहेब लक्ष्यकेंद्री वाटचाल करत गेले… तुमच्या आमच्यासाठी .!

परदेशातील नामवंत विद्यापिठाच्या पदव्या घेऊन आले.त्याकाळी लक्ष्मी पायावर लोटांगण घालत होती,त्यांना मुंबईच्या हायकोर्टात न्यायधीशाची नोकरी सरकार देत होतं; पण बाबासाहेबांनी नाकारली. कारण त्यांना फक्त गाव‌कुसाबाहेरच्या शोषित वंचिताना न्याय मिळवून द्यायचा होता !

कुणबी,महार , मांग , ढोर,चांभार , सुतार, लोहार,साळी, माळी, धनगर, कोळी भटक्या विमुक्त… बांधवांसाठी.डॉ.आंबेडकर यांनी न्यायीक मागणीसाठी महाड, काळाराम मंदिर सत्याग्रह केले.जिंकलेही.सर्वस्व अर्पण केलं.गोलमेज परिषद, पुणे करार ऐतिहासिक वास्तव समोर आहेच.”महामानवानी सगळं दिलं.मग माझ्या कुणबी,ओबीसी,मांग, सुतार,माळी,कोळी,लोहार तेली, चांभार बांधवांनो, आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काय दिलं ? आंदोलन, मोर्चात कधी सहभागी झालात? आपणही आरक्षणातून काहीजण गाडी बंगला, ऐश्वर्य धनीक, झालात.भावांनो ,आपल्याला जर त्यांना खरंच काही द्यायचं असेल तर एक काम करू या…
सर्व वंचित बहुजनांनी एका छताखाली येऊ या .!

कारण तुम्ही जर एकत्र आलात तरच तुम्ही येणाऱ्या नव्या पिढीला सांगू शकाल, येणाऱ्या संकटांशी सामना करू शकाल संविधान शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्हाला मान सन्मान मिळाला.बार्टीला ,आर्टी, सारथी आली. !” क्रांतिसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी,रोज उगवणा-या सूर्याला छातीठोक सांगितलं,
तू तिथला तर मी इथला सूर्य आहे..!
तू ता-यांना प्रकाशमान कर ..
मी सा-यांना प्रकाशमान करतो .

क्या बात है, डॉ.बाबासाहेब.? एवढा प्रचंड आत्मविश्वास आपल्यात कुठून आला ?
बंधू भगिनींनो, तो आला आहे त्यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे ! स्वतःला असे काही तयार करा की, तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी तुमचा हात धरून पुढे नेण्यासाठी अर्थात पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे.बरोबर ना? बघा जमलं तर.. परिवर्तनाला वाव आहे.  हाच वैचारिक विचारांचा वारसा पुढे चालवला जावा यासाठी लेखनप्रपंच आहे.
नमो बुद्धाय, जय भीम !
जय संविधान !!

समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे

सुयोग निवास बदलापूर (पुर्व)जि.ठाणे.

९३२४३६६७०९

Leave a Comment

× How can I help you?