वसईत पोलीस बुजवताहेत महामार्गावरील खड्डे

वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची असते. असे असताना NHAI च्या बेजबदार पणामुळे कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे पोलिस खड्डे बुजवण्यासाठी रसत्यालर उतरले आहेत. खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येतो. अनेक अपघात होतात.शिवाय अनेक अडचणींनाही तोंड द्यावे लागते. यावर तोडगा काढण्यासाठी वसईतील पेल्हार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी आणि त्याच्या सहकारी पेल्हार फाटा भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचा निर्धार केला.

त्यानंतर हातात फावड आणि घमेला घेऊन पोलिस रस्त्यावर उतरले. त्यांनी थेट खड्डे भरण्यास सुरूवात केली. मुंबई अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्याचा वाहन चालकांना मोठा त्रस्त सहन करावा लागतो. याशिवाय महामार्गावर व्हाईट टॉपिंगचे काम सुरू असून, त्याचा त्रास होत आहे. रस्ता आहे की खड्यांचे साम्राज्य असा प्रश्न या भागात पडला आहे. पण त्यावर कोणताही तोडगा निघत नाही हे पाहील्यावर पोलिसांनीच हे खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावर पोलिस खड्डे बुजबत आहेत हे पाहून लोकांनीही त्यांचे कौतूक केले.

Leave a Comment

× How can I help you?