मुंबई लातूर,बिदर मुंबई,सुपरफास्ट एक्स्प्रेसला मुरूड रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा

*मुंबई लातूर,बिदर मुंबई,सुपरफास्ट एक्स्प्रेसला मुरूड रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा.!*( १३ जून २०२५) *मध्य रेल्वेनीं प्रवाशांच्या सेवेसाठी प्रदीर्घ संघर्षानंतर 22108 मुंबई लातूर मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस रेल्वेगाडी सुरू केली.सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी, बार्शी,धाराशिव येडशी, धाराशिव, लातूर जिल्ह्यातील मुरूड,नेवळी औसारोड, लातूर, परिसरातील प्रवाशांनी स्वागत केले. परंतु या गाडीला राजकीय रंग लागल्यामुळे एकमेव असलेली लातूरकरांसाठी गाडी बिदर पर्यंत पोचली. तीही जड अंत:करणाने लातूरकर आणि धाराशिवकरांनी मान्य केली. असे असताना या गाडीला सुपरफास्ट,क्रॉंसींग असल्याचा बाऊ करून खरोखर हरंगुळ येथे थांबणारी गाडीचा थांबा बंद केला.आणि सरळ लातूर स्टेशन केलं. त्यामुळे मुरुड निवळीरोड,औसारोड आणि हरंगुळ लातूर येथील उतरणाऱ्या प्रवाशाना हकनाक पन्नास रुपये व अर्धा तास भुर्दंड बसतो आहे.लातूर स्टेशन उतरावे लागते आणि पाच नंबर ,गोंदेगाव, रामेगाव ,शिराळा ,बोरगाव (काळे) मुरुड ,निवळी, चाटा, बोपला ,एकुर्गा ,अशा ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर प्रवाशांना लातूरला जंक्शन स्टेशनला जाऊन शंभर रुपये भुर्दंड बसतो. ज्या ठिकाणी प्रवासी उतरतात त्यांचा एक तास वेळ वाया जातो. आणि तिकिटाचे पैसे वाटतात.याची तोंडी तक्रार डॉ.नागोराव बोरगावकर मराठवाडा प्रभारी बेटी बचाव बेटी पढाव ,प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य रेल्वे प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य यांना तोंडी हजारो रेल्वे प्रवाशांची अडचण व संवेदना म्हणून,मुरूड रेल्वे स्थानकावर थांबा बोलून दाखवली. त्यावर त्यांनी सकारात्मक उत्तर देऊन रेल्वे मंडळाच्या बैठकीत हा विषय घेऊन जाऊ असे आश्वासन केले.# लातूर मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस # ना.अश्विनी वैष्णव,रेल्वे राज्यमंत्री भारत सरकार!@९३२४३६६७०९*

Leave a Comment