रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने..
(०३ऑक्टोबर २०२४) *आज मानव मुक्तीचे प्रणेते संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समताधिष्ठित “भारत” उभा रहावा म्हणून जगाचा निरोप घेण्यापूर्वी दोन महिने अगोदर शेड्यूल्डकास्ट फेडरेशन बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या स्थापनेची शेवटच्या माणसाला मातीत मळलेल्यांना उचलून घेण्यासाठी शासनकर्ती जमात बनण्यासाठी घोषणा केली.”प्रज्ञासूर्य डॉ.भीमराव तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांनी राजकारण, समाजकारण, धम्मकारणाला कधीही साध्य मानले नाही.उभं आयुष्य समर्पित करून शेवटच्या माणसाला मातीत मळलेल्यांना कसा न्याय देता येईल यासाठी प्रखर लढा दिला.”त्यागमूर्ती रमाई”, अन् स्वत:च्या लेकरांची चिंता न वहाता शेवटच्या श्वासापर्यंत अनुषंगिक वाटचाल सुरू ठेवली. पक्ष स्थापन करण्यापूर्वीच गुरुवार दि.०६ डिसेंबर १९५६ ला महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या अनुयायांनी व कार्यकर्त्यांनी ०१ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूरला यशवंत आंबेडकर,एन.शिवराज, पी.टी.बोराळे, दादासाहेब रूपवते, कट्टी,ए.जी.पवार व अन्य मान्यवराच्या समवेत अध्यक्षीय मंडळाची बैठक झाली.०३ ऑक्टोबर १९५७ रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली.एन शिवराज अध्यक्ष झाले.१९५९ पर्यंतचे मजबूत संघटन, हेवेदावे, लालसा, वैयक्तिक मतभेद यामुळे टिकले नाही.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एवढे मजबूत खंबीर नेतृत्व बहूजनांच्या लेकरांना लाभले नाही.कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्यानंतर दिशादर्शक कोणी दिसले नाही.सामाजिक उत्थानासाठी राबताना कोणी दिसले नाही.पुढे “भंडारे गट”,”गवई गट पडले”. अवसान घातकी, महत्वकांक्षी नेतृत्वामुळं महापरिनिर्वाणानंतरचा काळोख पसरला होता तो तसाच, वटवृक्ष उन्मळून पडावा अन् खोप्यातील चिमणी पाखरं हवालदिल व्हावी अशीच,त्यानंतर उठाव झाला.युवकात चेतना निर्माण झाली.त्यामुळेच काय दलित पँथर ही अरे ला,का रे?म्हणणारी जहाल चळवळ उभी राहिली.आज भारतीय रिपब्लिकन पक्ष,मा.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर व मा.रामदास आठवले साहेब यांनी आपल्या परिने पक्षाचे अस्तित्व जपले.१४ ऑक्टोबर १९५६ ला, विजयादशमीच्या दिवशी सम्राट अशोकानंतर नागपूर दीक्षाभूमीवर लाखोंच्या उपस्थितीत दुसऱ्यांदा विज्ञानाच्या कसोटीवर उतरलेल्या भारतभूमीतला तथागत गौतम बुद्धांचा धर्म स्वीकारला.धम्मचक्रप्रवर्तन करीत समताधिष्ठित भारत निर्माण चळवळीचे वर्तूळ पूर्ण करीत विश्वासपूर्वक स्वाधीन केले.चला सत्तेचं राजकारण करू या , समताधिष्ठित भारत निर्माण करू या.जयभिम! जय संविधान!!@ समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे महाराष्ट्र शासन सोशल मीडिया ठाणे,+९३२४३६६७०९*