सोने दरवाढीचे ‘ट्रम्प’ कार्ड

सोन्याच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ ही चिंताजनक आणि विचार करण्यासारखी आहे. 83 हजार रुपयांच्या जवळपास पोहोचलेल्या दहा ग्रॅम सोन्याचा भाव प्रथमदर्शनी जगातील चिंताजनक परिस्थितीची साक्ष देतो. मात्र, सोन्याच्या किमती वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. ज्यांचा विचार करायला हवा. सर्वप्रथम सोन्याची जागतिक मागणी वाढली आहे. जागतिक स्तरावर आर्थिक अस्थिरता वाढल्याने हे घडले आहे. जगात राजकीय अनिश्चितता असल्याने आर्थिक अस्थिरता वाढली आहे. प्रत्यक्षात डिसेंबर महिन्यापासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. अमेरिकेने डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवड केली तेव्हाची हीच वेळ आहे. ट्रम्प यांनी जगाच्या अर्थव्यवस्थेची चिंता वाढवली आहे. त्यामुळे लोक सोन्यातील गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानू लागले आहेत. आर्थिक अनिश्चितता दूर होताच सोन्याच्या किमतीत काडीशी नरमाई येण्याची शक्यता आहे. आजही बहुतांश लोकांची विचारसरणी पारंपारिक आहे आणि सोने ही मूलभूत गुंतवणूक मानली जाते. आज सोन्यात जास्त गुंतवणूक आहे. सोन्याची जागतिक मागणी वाढवण्यात सर्वसामान्य लोकच नव्हे, मोठ्या कंपन्या अगदी सरकारही सहभागी होत आहेत.

सोन्याच्या किमतीवर चलने आणि व्याजदरांच्या बदलत्या मूल्यांचाही परिणाम होतो. सरकारी धोरणांमुळे सोन्यावरही परिणाम झाला आहे. इतर चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची ताकद यासारख्या आंतरराष्ट्रीय घटकांचाही भारतीय बाजारातील सोन्याच्या दरांवर परिणाम होतो. 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 8800 रुपयांनी वाढ होऊन 82 हजार रुपयांचा आकडा पार करणे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. चांदीचा प्रति किलोचा भाव 99,500 रुपयांच्या आसपास आहे. जगात राजकीय अनिश्चितता कायम राहिल्यास किमती आणखी वाढतील, अशी भीती व्यक्त होत आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी 2021 मध्ये अध्यक्षपद सोडले तेव्हा भारतात प्रति दहा ग्रॅम सोन्याचा भाव 49,000 रुपयांपर्यंत पोहोचला नव्हता. जग झपाट्याने बदलत आहे. पण आर्थिक घडामोडी तितक्या सकारात्मक प्रगती करत नाहीत. शेअर बाजारातील गुंतवणूक अजूनही चिंतेच्या पलीकडे नाही. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीचे नुकसानही सुरूच आहे. मालमत्ता व्यवसायही गेल्या दोन वर्षापासून महागाईने त्रस्त आहे. मागणी जास्त नाही, पण घर आणि मालमत्तेच्या किमती वाढताना दिसत आहेत. लोकांना असे वाटते की मालमत्तेतील गुंतवणूक दीर्घकाळ अडकून राहील आणि त्यातून मिळणारे उत्पन्नही फारसे नाही. अशा स्थितीत सर्वांच्या नजरा सोन्याकडे वळतात. कठीण काळातही सोने खरेदी-विक्री करणे तुलनेने सोपे आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर त्याची मागणी वाढणे स्वाभाविक आहे.

आता प्रश्न असा आहे की, सोन्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी उपाय काय? पहिला उपाय म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली धोरणे जगासाठी चिंताजनक बनवू नयेत. देशांमधील परस्पर तणाव वाढू नये. ट्रम्प यांनी जगाच्या एकतर्फी मोठ्या परिवर्तनाचा आग्रह धरला तर बाजारात अनिश्चिततेचा काळ येईल. ट्रम्प यांच्या कठोर किंवा स्वार्थी कृतींमुळे जगाचे किती नुकसान होणार आहे. याचा आकडेमोड आता आर्थिक तज्ज्ञ करू लागले आहेत. इतर देशांना आणि अमेरिकेच्या प्रतिस्पर्धी जागतिक संघटना आणि आघाड्यांनाडी संयम आणि शहाणपणा दाखवावा लागेल, जेणेकरून मागणी-पुरवठा आणि बाजारातील व्यवहार यांच्यात बाजवी समतोल राखला जाईल आणि कोणत्याही वस्तूची किंमत नियंत्रणाबाहेर जाऊ नये.

: मनीष वाघ

Leave a Comment

× How can I help you?