त्रीवार वंदन बौद्ध धर्मगुरू पूज्य दलाई लामा

त्रीवार वंदन बौद्ध धर्मगुरू पूज्य दलाई लामा !

*NOBLE PEACE WINNER जागतिक नोबेल पुरस्कार प्राप्त,जर्मन मीडिया प्राईज यासारख्या अतिउच्च पुरस्काराने गौरविण्यात आलेलं आंतरराष्ट्रीय बौद्ध अनुयायांच्या ह्रदयसिंहासनावर अरूढ झालेलं‌ प्रेरणादायी व्यक्तिमत्व दलाई लामा होय.! दलाई लामा याचा अर्थ ज्ञानाचा महासागर होय.! जगभरातील बौद्ध अनुयायी दलाई लामा यांना आपले धर्मगुरू मानतात.तसं पाहिलं तर सिध्दार्थ गौतम,ज्याला सामान्यता बुद्ध म्हणून संबोधले जाते.क्षत्रीय युवराजानी राजवाडा सोडला.भटकंती करीत वास्तव सत्याला जीव लावत तपस्वी झाले.पुढे धार्मिक शिक्षक बनले.सहाव्या शतकात दक्षिण आशियाई भागात वास्तव्य करीत त्यांनी विज्ञानाच्या कसोटीवर उतरणा-या बौद्ध धर्माची स्थापना केली.महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील मुख्य सचिव डॉ .हर्षदीप कांबळे (IAS) व‌ थायलंडच्या उद्योजिका रोचना कांबळे, यांच्या पुढाकाराने २२ नोव्हेंबर २०२२ रोजी संभाजीनगर येथे घेण्यात आलेल्या तीन दिवसीय ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत पूज्य दलाई लामा हे प्रमुख अतिथी म्हणून होते.तेरा देशातील बौद्ध भिक्खू, अखिल भारतीय भिकू संघाचे संघानुसार श्रीलंकेचे भदंत महानायक महाथेरो डॉ. वरकगोडा, भदंत बोधीपालो महाथेरो, भदंत चंदिमा सारनाथ, भदंत मैत्री महाथेरो नेपाळ , भदंत संघदेशना लडाख , भदंत शिवली श्रीलंका, भदंत वाॅनसन साऊथ कोरिया, यांची उपस्थिती असली तरी प्रमुखाकर्षण दलाई लामाच होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्यांनी पत्रकार परिषदेत उत्तरे देत असताना व्यक्त केलेले विचार अत्यंत दिशादर्शक होते.त्यातील महत्त्वाचे विधान म्हणजे भारताला वैज्ञानिक शिक्षणाच्या आधारे बौद्धिक उंची वाढवण्याची गरज आहे.! नालंदा विद्यापीठातील परिवर्तनाचा मार्ग चीन सहित जगाला मान्य करावाच लागेल…!अशा या द्रष्ट्या जागतिक धम्मगुरुंचा वाढदिवस !! “पूज्य दलाई लामा” यांना ९० व्या वाढदिवसाला अधोरेखित करताना शतायुषी व्हा म्हणून करोडो बौद्ध अनुयायांच्या वतीने त्रीवार वंदन करतो.एकमात्र खरं मानवमुक्तीचे प्रणेते संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्हाला बौद्ध धर्म कळाला अन् आम्ही बौद्धमय झालो.नमो बुद्धाय ! भवतु सब्बं मंगलं !! जय भीम !!!*

*@ समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे महाराष्ट्र शासन!+९३२४३६६७०९*

Leave a Comment