*जग बदल घालुन घाव मज सांगून गेले भीमराव.!आण्णा काय लिहू मी तुमच्यासाठी.?*(बदलापूर १८ जुलै २०२५,साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे विशेष) “*जग बदल घालुनी घाव, मज सांगून गेले “भीमराव’ ! कृतार्थ भावनेने आपलं पहिलं वाहीलं साहित्य अपत्य मानव मुक्तीचे प्रणेते भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीला वाहिलेल्या “अण्णाभाऊ” काय लिहावे मी तुमच्यासाठी.? सत्तेच्या मदमस्त हत्तीच्या गंडस्थळावर घाव घालणारी तुझी लेखणी आता कुणातच येथे दिसत नाही. दिसतायत त्या सत्तेच्या रखेल..! अण्णाभाऊ झाल्यात काही लेखण्या, पद्मश्री नामदेव ढसाळ, साहित्यसूर्य पद्मश्री नारायणदादा सुर्वे ,उत्तम कांबळे सर, यांच्यानंतर कोणीही सत्य लिहित नाही.हे कालच्या तेरा कोटी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून उभं राहिलंलं “शिव- शाहू- फुले आंबेडकर” यांच्या महाराष्ट्र विधानमंडळातील गुंडगिरी प्रवृत्तीचं आक्रंदन उभ्या जगानं पाहिलं . जागतिक पातळीवर गेलं तरीही सत्तेच्या रखेल झालेल्या लेखण्या वास्तव मांडत नाहीत. बोथट व्हाव्यात .?मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ “लाल बावटा” कलापथकातून मांडणा-या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी.! लोकशाहीचा आधारस्तंभ माणला जाणारा चौथा स्तंभही बिथरतो का आहे.? महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेची दिशाभूल होत आहे का? याचं उत्तर “मायबाप सरकार” म्हणून आपल्याकडेच आहे. नाही का? माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होते काहिली. !संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अण्णाभाऊंच्या अभिजात लेखन साहित्य सामर्थ्याला तोड नाही.! फकिरा,माकडीचा माळ, वारणेचा वाघ, वैजयंता,आबी,लाडी, केवड्याचं कणिस, कुळवाडी भूषण,माझा रशियाचा प्रवास, कथा,कादंब-या, नाटकं, कथासंग्रह,सदाशिव पेठेतील बोरू बहाद्दरांना लाजवतील अशीच! इस.सन.२००७ ला, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचारमंच संभाजीनगर येथे आम्हाला समाजभूषण पुरस्कार स्वर्गीय लोकनेते आदरणीय गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते मिळणार होता.पण साहेब, उशीरा आले.त्याअगोदर आम्ही अध्यक्षांच्या हस्ते सन्मानित झालों.नंतर मुंडे साहेब यांची भेट झाली.पाठीवर हात ठेवत चांगले काम करीत रहा.शुभेच्या दिल्या. झोपडीत जन्मला आलेल्या अण्णाभाऊ नावाच्या शब्द कुबेरांच्या नावाने मला मिळालेला समाजभूषण पुरस्कार, नवी उर्मी देत राहिला. आज अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ शासनाने सुरू केलं .पण आजही मुंबईतील चिरा बाजार , अन् सांगलीतील वाटेगाव उपेक्षितच राहिलं.! गब्बर मात्र स्वार्थी पुढारी झाले.साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची दर्दभरी दास्तान, आघाडीचे लेखक “विश्वास पाटलांनी” मजबूत मांडली आहे. एक मात्र खरं आयुष्याच्या सायंकाळी फकीरा कादंबरी मानव मुक्तीचे प्रणेते संविधान शिल्पकार प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीला अर्पण करताना अण्णा पोटतिडकीने म्हणतात, ही पृथ्वी शिष्याच्या मस्तकावर तरली नसून कष्टकरी कामगार, शोषितांच्या तळव्यावर तरली आहे.जग बदल घालुनी घाव मला सांगून गेले भीमराव.! अंग झाडून निघ बाहेरी घे बिनीवरती घाव.! प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन लेकरांना नवी दृष्टी दिली. विषमतेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केले. अण्णाभाऊंनी गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी लोकजागरातून लढा देण्याचे आवाहन केले. धनवंतानी अखंड पिळले. धर्मांधानी तसेच छळले.आशा दीड दिवसाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सिर्फ संयुक्त महाराष्ट्राची लोक चळवळ चालवली नसून ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकऱ्यांच्या तळव्यावर तरली आहे. असे शासनशोषण व्यवस्थेला ठामपणे सांगितले.कामगार, श्रमिकांच्या, भाळावरचा जाहिरनामा मांडणारे सातासमुद्रापार मराठीला घेऊन जाणारे साहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव साठे तथा “अण्णाभाऊ” यांनी आपल्या साहित्यातून समाजातील गरीब आणि womLess लोकांवरील अन्याय अधोरेखित केला.”अण्णाभाऊ” तुमच्या नावाने, अनेक गब्बर झाले.पण लढायची वेळ आली की,आपले अनुयायी शेपूट घालून, आपल्याप्रती खोटं अश्रू ढाळत राहिले.स्मशानातील सोनं, त्यालाही भाव आहे!.आण्णाभाऊ आपल्या अनुयायी जोपर्यंत आपल्या विचारांची लढावू जमात उभी रहात नाही.तोपर्यत फक्त आपल्या पुतळ्याच्या शेजारी जय लहुजी, अन् आपल्या नावाने जयजयकार होईल.! पण् बिनिवरचे घाव तसेच राहू नयेत हेच आजच्या दिवसाचं आर्जवं.जय संविधान! जयभिम!!*
*@ “जागल्या ‘समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे महाराष्ट्र शासन!*