*गुजराती -मारवाडींच्या आर्थिक शक्तीपुढे* *सत्ता,राजकीय पक्ष आणि प्रशासनाने गुडघे टेकले…* *फक्त सोशल मिडियामुळे अग्रवालवर कारवाई!!* *लेखक : अ‍ॅड. मनोज वैद्य*

महाराष्ट्रात मराठी माणूस आणि राज्यकर्ते आपला आब राखून होते.व्यापार वर्ग म्हणजेच गुजराती, मारवाडी आपापल्या व्यावसायिक हितरक्षणासाठी सत्ताधारी पक्ष, प्रशासन आणि निवडक दबंग विरोधी पक्षनेते यांच्याशी साटेलोटे करताना. कायम झुकून असायचा. त्याला संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची पार्श्वभूमी होती. कारण गुजराती मोरारजी देसाई यांनी एकशे पाच बळी घेतले होते.त्याचा सुप्त संताप महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होता.
पण याला छेद दिला लोकमतवाले जवाहर दर्डा यांनी. त्याचे आजचे टोक मंगलप्रभात लोढा हे आहेत. त्यात मोदी-शाह यांचे सरकार २०१४ केंद्रात आले. त्यामुळे या समाजातील गावपातळीवरील नेते जास्तच मुजोर झाले.त्याला तोंड देण्याऐवजी आपल्या सर्वच स्तरावरील सर्वच पक्षातील मराठी नेत्यांनी मान टाकली.
मराठी भाजपने साहजिकच लोटांगण घातले. त्यातूनच भावेश भिंडे मुजोर झाला. तर अग्रवाल प्रकरणाने सत्ताधारी नेते आणि प्रशासनाला अक्षरशः नागडे केले. सोशल मीडियामुळेच अग्रवाल कुटुंबाच्या तीन पिढ्या पोलीस कस्टडीत आहेत.
सहाशे कोटीची उलाढाल, दोन फाइव्ह स्टार हॉटेल असलेल्या अग्रवाल कुटुंबाची मेहेरबानी घेतली नसेल असा नेता पुण्यात दुर्मिळच असेल. मग तो अजित पवार गटाचा आमदार टिंगरे पहाटेच उठून पोलीस स्टेशनला गेला त्यात नवल ते काय? सामान्य माणसाला अशी तत्परता दाखवतील काय? यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका नक्कीच संशयास्पद आहे. पण या प्रकरणातून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फारच नाचक्की झाली. आता ते खात्याची अब्रू झाकण्याची प्रयत्न करत आहेत.पण एकीकडे झाकले की दुसरीकडे उघडे पडतेच की!
अजूनही या प्रकरणात मोठें मासे बाहेर आहेत. आरोपीचे रक्त बदलण्याच्या प्रकरणात दोन डॉक्टर्स लहान मासे आहेत, त्यांना पोलीस कोठडीत पाठवले आहे.पण त्यांचे गॉडफादर बाहेर असून,ते आरोपी डॉक्टर्सना “आता सहन करा. मग भविष्यात मोठ्या पदावर बसवू” असे आश्वासन देण्यात मग्न असतील. कारण यापूर्वीसुद्धा यातील दोषी डॉक्टरला ससूनमधे आणण्यात अजित पवार गटाचे नेते गुंतले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वास्तविक पाहता अग्रवाल कुटुंबाची ईडीकडून चौकशी होण्यासाठी किरीट सोमय्या काहीच बोलत नाहीत.याच पुण्यातील दोन मराठी उद्योजक डीएस कुलकर्णी आणि अविनाश भोसले ईडीकडून उध्वस्त झाले. पण त्यातून याच पुण्यातील अग्रवालच्या ब्रह्मा कॉर्पसारख्या अनेक गुजराती-मारवाडी बांधकाम कंपन्या असतील, त्यांना नक्कीच मोकळे रान मिळाले असेल. हे आपल्या मराठी उद्योजकांना देशोधडीला लावण्याचे नियोजनबद्ध कटकारस्थान आहे.
कर्नाटकात दुधाचा राज्याचा स्थानिक ब्रॅण्ड आहे. तिथे गुजरातच्या अमूलने प्रवेश केला. पण तिथल्या स्थानिक लोकांनी एकजूट दाखवली, अमूलवर बहिष्कार घालून बेजार केले. कर्नाटकी जनतेने आपले राजकारणी काय भूमिका घेतात याची वाट नाही बघितली.
इथे महाराष्ट्रात तर आपल्या महानंदचा गुजरातने ताबाच घेतला. पण मराठी माणूस फक्त हल्ली काही प्रमाणात शिवजयंतीलाच जागा होतो. तो काही कृती करायचे सोडा पण व्यक्तसुद्धा होत नाही.
मुंबईतील एक विरेन शाह नावाचा गुजराती व्यापारी मराठी पाट्यांना विरोध करण्यासाठी सुप्रिम कोर्टापर्यंत जातो. पण त्याच्या तोंडाला काळे फासण्याची हिंमत दाखवणारा एकही मराठी मायचा लाल नाही, हे दुर्दैवी आहे.
उठाव सामान्य लोक करतात,कोणी राजकारणी करत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. यांच्या व्यवसायावर बहिष्कार घाला हे आपल्याला कोणी नेत्यांनी कशाला सांगायला हवे?
लेखक-संपादक.
अ‍ॅड. मनोज वैद्य.

Leave a Comment

× How can I help you?