ठाण्याचे पालकमंत्री दाखवा अन् 1 गावठी कोंबडा, वलगणीचे मासे बक्षीस मिळवा

मुरबाड : गेल्या अडीच वर्षांपासून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुठेच फिरकले नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष दीपक वाघचौरे यांनी केला आहे. आरोप करीत त्यांनी शंभुराज देसाई यांच्या नावाची बॅनरबाजी केली आहे. सध्या हे बॅनर मुरबाडमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासातले म्हणून ओळखले जातात. म्हणूनच साताऱ्यातील असूनही त्यांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मुरबाड तालुक्यात आदिवासी भागातील रस्त्यांच्या समस्या, वैद्यकीय सुविधांचा अभाव यांसारख्या अनेक प्रश्नांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहनांची कोंडी होत आहे. या महामार्गावरील वासिंद, खातिवली, आसनगाव या रेल्वे स्थानकाजवळील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची कामं सुरू असल्याने याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. याबाबत स्थानिकांकडूनही तक्रार करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप त्यावर उपययोजना करण्यात आलेली नाही.

Leave a Comment

× How can I help you?