जया अंगी मोठेपण तया यातना कठीण..? वाईट तितूके इथे का पोसले? भल्यापणाचे भाग्य नासले..?
१०८ रुग्णवाहिका वेळेवर पोचली नाही याचा ठपका ठेवून उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालय -३जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बनसोडे यांना कोणत्याही चौकशीविना आरोग्यविभागाने केलेले निलंबन रद्द करण्यासाठी लोकनेते आदरणीय किसन कथोरे आमदार मुरबाड विधानसभा यांची आज सकाळी भेट घेतली.
डाॅ.बनसोडे हे अतिशय कठोर परिश्रमाने आपल्या बळावर पुढे आलेले जिल्हा शल्यचिकित्सक! फक्त गोरगरीब रुग्णांची सेवा करणे हाच धर्म ! वैद्यकीय सेवेला व्यवसाय न मानता मानवी कल्याणासाठी अहोरात्र धडपडणा-या वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी एक होय! आज शासकीय रुग्णालयात सेवा बजावत खाजगी दवाखाने चालवणारे राज्यात बरेच डॉक्टर आहेत. पण डॉ.बनसोडे यांनी आदिवासी भागात ढोर मेहनत करून जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून उल्हासनगरमधील रूग्णालयाचा चेहरा मोहरा बदलला.स्वच्छतेला महत्व दिले.
मी मांडा टिटवाळा, मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर येथील गोरगरीब रूग्णांकडे जातीनं लक्ष दिले इतकेच काय आमच्यासमोर बदलापूरचा (पूर्व) रूग्ण उपचार घेत असून त्याची काळजी घ्या असे संबंधित डॉक्टरांना फोनवरून विनंती केली. अशा वैद्यकीय अधिकाऱ्याला कारण नसताना निलंबित करणं अन्यायकारक आहे.
१०८ रूग्णवाहिका महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस, भारत विकास ग्रुप पुणे यांना शासनाने कंत्राट दिले आहे. यात भारत विकास ग्रुप डायरेक्टर,CPM,DAM, यांच्याशी चर्चा करून किंबहुना को-ऑर्डीनेटरची जवाबदारी असताना सिव्हिल सर्जन डॉ.बनसोडे यांच्यावर ठपका का ठेवला?संबंधित कंपनीला वाचवण्यासाठी सिव्हिल सर्जनचे निलंबन? योग्य नाही. याचे निवेदन लोकनेते आदरणीय किसन कथोरे (आप्पा) आमदार मुरबाड विधानसभा यांना देण्यात आले असून, त्यांवर आरोग्यमंत्री ना.प्रकाश आबिटकर यांना निलंबन रद्द करण्याची विनंती करावी केली आहे.
लोकनेत्यानी अश्वाशित केले असून संबंधित तारांकीत प्रश्न विचारणाऱ्या आमदारांशी बोलतो असे आश्वासीत केले आहे.
: समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे,
सोशल मीडिया ठाणे जिल्हा ग्रामीण
+९३२४३६६७०९