महाराष्ट्र राज्यात मोठ्या घडामोडी घडवून एक महायुती आकारास आली.एकेकाळी प्रमोद महाजन यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत शिवसेना आणि भाजपची युती घडवून आणली.तीन दशके या युतीने आपले अस्तित्व राखले.आणि त्याला हिंदुत्वाचे ध्येय असल्याने नैतिकतेचे अधिष्ठान होते.अटलबिहारी वाजपेयी यांचा उदारमतवाद आणि बाळासाहेब ठाकरे यांचा दिलदारपणा यातून या युतीला बळकटी मिळाली.
परंतु भाजपमध्ये मोदी-शाह युग आले.लालकृष्ण
आडवाणी अडगळीत गेले.प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचे संशयास्पद मृत्यू झाले.देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र म्हणजे मोदी देशात तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व भाजपमधे प्रस्थापित झाले.
आपल्या सोबत असलेल्या प्रादेशिक मित्रपक्षाला अंकित करुन गिळंकृत करायचं.हे भाजपचे धोरणच होते.शिवसेनाप्रमुख कालवश झाल्यानंतर,भाजपला ही योग्य संधी वाटली.त्यानुसार मोदी-शाह आणि फडणवीस यांनी राजकीय पावले उचलण्यास सुरुवात केली.
शिवसेनेचे कार्यप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर दोनच पर्याय उपलब्ध होते.एकतर भाजपचे मंडलिकत्व पत्करणे अथवा शिवसेनेचे अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करणे.अर्थातच उद्धव ठाकरे यांनी गुलामगिरी नाकारली.आणि त्यातून महाविकास आघाडी आणि महायुती यांचा जन्म झाला.
शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष सर्व कायदेकानून आणि नीतिनियम धाब्यावर बसवून फक्त फोडण्यात आले.त्यानंतर स्वायत्त यंत्रणा हाताशी धरुन,त्या पक्षांची मूळ नावे आणि चिन्हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून काढून घेण्यात आली.नकली असली ठरविण्यात आले.
या तोतया पक्षांना हाताशी धरून भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी सोबत महायुती आकाराला आली.या
युतीतील दोन घटक पक्षामधील अजित पवार यांनी नागपूर येथील संघाच्या रेशीमबाग येथे नतमस्तक होण्यास नकार दिला.बाकी ईडी वैगरे मुद्दे वेगळच.
त्यात नंतर बिनशर्तवाले मनसे या महायुतीत सामिल झाले.अशी ही धरपकड एलिव्हन महायुती झाली.
तर अश्या या महायुतीच्या गलबताला आता तडे जायला सुरुवात झाली आहे.लोकसभा निवडणुकीत उमेदवारी जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुराग्रही भूमिका घेतली.त्यानंतर ऐन लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेत कुरघोडीचे प्रकार घडले.
त्यात भर पडली विधानपरिषद निवडणुकीची.या महायुतीने एकमेकांशी चर्चा न करता थेट उमेदवारी जाहीर केली.याला सुरुवात केली भाजपने.ठाणें येथे कोकण पदवीधर मतदार संघात विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांची उमेदवारी जाहीर केली.त्यावर मनसेने ठाण्यातील अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली.आता शिंदेसेनेने त्यांचे सचिव संजय मोरे यांना उमेदवारी अर्ज घेण्यास सांगितले आहे.
तिथे मुबईत पदवीधर व शिक्षक मतदार संघात आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातसुद्धा अशीच महायुतीत परिस्थिती आहे.महायुतीत संवादहिनता निर्माण झाली आहे.
याला कारण आहे,लोकसभा निवडणुकीत तसेच मतदानात आणि मतदानोत्तर चाचण्यामधून लक्षात आले की,शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांना जनमानसात स्थान नाही.भाजप
एक सूत्र पाळते.जे उपयुक्त नाही ते फेकून द्यायचे. त्याचे ओझे वाहत बसायचे नाही.
वत्यानुसार त्यानी विधानपरिषद निवडणुकीत आपल्या घटकपक्षांना हिंग लावून विचारले नाही.तर
शिंदेगट आणि अजित पवार आपल्याला दुय्यम वागणूक मान्य करणार नाहीत.एकूणच पाच-सहा महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत या महायुतीत मोठ्या उलथापालथी घडतील.आणि त्यात सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे निकाल लागून किंवा लावले जातील.
त्यातून ही समस्या सोडविली जाईल.ना रहेगा बाँस ना बजेंगीं बांसरी!
राजकीय विश्लेषण-
अॅड. मनोज वैद्य
(टिप-लोकसभा निवडणूक निकाल लागण्यापूर्वी हा लेख लिहिला आहे)
महायुती फुटीच्या दिशेने..! लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच एकमेकांच्या उरावर बसले!!
Post Views: 523
Recent Posts
देवांनो ! तुम्ही सुद्धा!…
October 23, 2025
No Comments
पोलिस हुतात्मा दिन
October 21, 2025
No Comments
गोष्ट ॲक्वा लाईन ट्रेनची..
October 21, 2025
No Comments
एकल शिक्षकी शाळा : देशाच्या भविष्यापुढे प्रश्नचिन्ह
October 17, 2025
No Comments
डिएला : अल्बेनियाची पहिली एआय मंत्री
October 15, 2025
No Comments


