मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे सोमवारी अमेरिका येथे निधन झाले. न्यूयॉर्कमध्ये भारत-पाकिस्तान T20 विश्वचषक सामना पाहण्यासाठी ते अमेरिकेला गेले होते. विविध माध्यमांमधून काळे यांना आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्रातही सगळ्यात आधी आम्हीच म्हणत शिंदे सेनेनेही काळे यांना आदरांजली वाहण्याचे पत्रक बनविले. पण घाईघाईत काळे यांच्या ऐवजी माजी कसोटीपटू संदीप पाटील यांचे छायाचित्र लावण्यात आले. समाज माध्यमातून ओरड होताच शिंदे सेनेनी मग पाटील यांचे छायाचित्र बदलले आणि अमोल काळे यांचे छायाचित्र लावले. पण घाईगडबडीत झालेल्या चुकीमुळे शिंदे सेनेला चांगलाच मनस्ताप झेलावा लागला.
