“यशस्वी होते त्याला क्रांती म्हणतात,तर फसते त्याला बंड.” नेमक अजितदादा पवार यांच्या बाबत काय घडलं याचा माझ्या परीने माझ्या लेखनात घेतलेला आढावा….
प्रशासनावर जरब, कोणतेही काम तडीस नेण्याची किमया, कामाची हातोटी,मेहनत घेण्याची तयारी,आणि यातून उत्कृष्ट संघटन आणि त्यातून राज्यभर कार्यकर्त्यांचे विणलेले जाळे, अर्थात राजकीय गुरू काका शरद पवार साहेब यांच्या मुशीतून त्यांच्या पठडीतून तयार झालेले,हरजबाबी, बिंधास्त,धाडसी उमदे नेतृत्व म्हणजे अजित पवार…..
त्यांच्यातला एक अवगुण म्हणजे सत्तेशिवाय अधिक काळ ते बाहेर थांबू शकत नाहीत,अर्थात काका शरद पवार साहेब यांच्या कडूनच हा गुण आला असला तरी काकांसारखा वेळ साधने सावज आणि निशाणा यांची खात्री झाल्या शिवाय भात्यात हात घालायचा नाही हे मात्र समजून घेण्यात अजितदाांनी गफलत केली आहे.
आणि म्हणुनच दोन तीन वेळा चुकीचे प्रयोग घडले,आणि भाजप नेतृत्वाने ते हेरून डाव टाकला,मध्यप्रदेश येथील जाहीर सभेत दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सिंचन घोटाळा, शिखर बेंक घोटाळा अर्थात सहकार खाते अमितभाई शहा यांच्याकडेच असल्या कारणामुळे त्यांनी घोटाळ्याच्या फाईलस अगदी कोळून प्याल्या असतील हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. छोड दिया जाय या जेल दिया जाय बोल तेरे साथमे क्या किया जाय,आणि पहिला घाव आणि डाव तेथेच टाकला गेला…..
खरतर घाबरतो कोण,अर्थात जो चुकतो तोच,कर नाही त्याला डर कशाला पण इथेतर फक्त पंजा नाही तर अकबंद हातच दादांचा अडकला गेला होता….आणि तदनंतरच नाट्य सर्वश्रुत सर्वानाच माहीत आहे,त्याच्यातच चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला बारामतीत पवार संपवायचे आहेत हे मोठं वक्तव्यं जगजाहीर झाल, फोडाफोडी, सत्ता प्रवेश उपुख्यमंत्रीपदाची माळ हे सर्व ठीक होत, परंतु घरातल्या घरात,घरातील उमेदवारी उभा करण्याचा शब्द देऊन दादांनी मोठी चूक केली अजितदादा फसले,या गोष्टीला सर्वच कुटुंबाचा विरोध होता, सौ,सुनेत्रा पवार या प्रथम लोकसभा लढवायला तयारच नव्हत्या आणि त्यांचा तो पिंड ही नाही, परंतु इकडे आड तिकडे विहीर (ईडी,जेल,बेल) अवस्था अजितदादांची झाली,सहनही होईना आणि सांगता देखील येईना अशी केविलवाणी अवस्था झाली,आणि कुटुंबासह समस्त बारामतीकर यांच्या ना पसंतीस दादा उतरले स्वकीय आणि परकीय अर्थात शिवथारे बापू, हर्षवर्धन पाटील,थोपटे मोठ्या प्रमाणात असलेला धनगर समाजच काय सर्व (मधमुद) आदी सर्वच जणांनी मोठा धोका दिला आणि वहिनी हरल्या…
लोकसभा निकाला नंतर भाजपच्या संघाचे मासिका मधून भाजप पराभवाला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी मुळे मोठा फटका बसल्याचे नुकतेच जाहीर केले,केंद्रीय मंत्री मंडळात न मिळालेले स्थान, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यातील मंत्री पदाची रस्सीखेच, सुनेत्रा पवार यांच्या पराभव नंतर स्त्री हट्ट खासदार,मंत्री होण्याची अपेक्षा,इतर सहकारी यांना डावलले गेल्याची नाराजी, भाजप डावलत आहे याची होत असणारी जाणीव, आण्णा हजारे यांनी अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचार बाबत घेतलेली आक्रमक भूमिका,आणि आगामी विधानसभा निवडणुकी करिता अनेक आमदार आपल्याला सोडून जातील की काय ही सतत वाटणारी भीती ही आणि असंख्य कारणांनी सध्या अजितदादा पवार ग्रासले असून राजकीय डावपेचात बुडत्याचा पाय खोलात अस काय होत आहे का…?
अधिकाधिक खोल जात आहेत का….?
अजितदादा च्यारीबाजूंनी चुक्रव्ह्यात अडकले आहेत का…?
अजितदादांनी केलेल्या बंडाची क्रांती होईल…?
बंड थंड होईल…?
की बंड अवकाची घटका मोजल की बंडच राहील…
माझ्या परीने मी माझ्या लेखनात घेतलेला आढावा,
तुम्हाला काय वाटत…?
———- ——— –
डॉ,नंदकुमार ल.कांबळे…✍️