‘चाकाची खुर्ची’ असे शीर्षक मी मराठीत देऊ शकत होते. पण चाकाची खुर्ची म्हटलं की हल्ली संगणकावर काम करण्यासाठी त्या ,खाली चाक असलेल्या,फिरत्या खुर्च्या वापरल्या जातात, त्या पण नजरेसमोर येतात .त्यामुळे मला wheel chair चाकाची खुर्ची याचा अर्थ, म्हणजे आजारी व्यक्ती जी खुर्ची वापरते किंवा अपंग व्यक्तीच्या खुर्च्या,रुग्ण वापर करतात त्या प्रकारची खुर्ची अपेक्षित होती .म्हणून मी शीर्षक दिलं आहे,wheel chair.
स्टीफन हॉकिंग सर,जगभरात प्रसिद्ध शास्त्रज्ञ हे त्याच्या विविध,व्याधी व आजारांच्या गुंतागुंतीमुळे आयुष्यभर व्हील चेअर वरून काम करत होते. सरांचे जवळ अतिशय तल्लख मेंदू होता .त्यामुळे संगणकाच्या जोडणीने ते वेगळ्या वेगळ्या आज्ञा देऊन आपली काम करत असत.ते यशस्वी आणि एकमेव असा आपल्या अपंगत्वावर मात करायचा प्रयत्न करत असत.
व्हील चेअर ही फार पूर्वीच्या काळी,1970त एक वस्तू ,हिंदी चित्रपटातील आजारी अथवा अपंग व्यक्ती अति श्रीमंत आहे,हे दाखवण्यासाठी दाखवली जाई. रस्त्यावरचा गरीब तो तर आपल्या चौकोनी फळकुटाला चार चाक जोडून तिच्यावर बसून कसा तरी ,क्रूड लाकडी प्रकारे ,जमिनीवर हाताने जोर देऊन ,फळी पुढे ढकलत ढकलत जाताना दाखवत. उदाहरणार्थ शान चित्रपटातील अब्दुल !
“आते जाते हुए मै सबकी खबर रखता हुं,
नाम अब्दुल है मेरा ….
त्याकाळी खूप गाजलं होतं आणि त्याकाळी अशा चौकोनी चाक असलेल्या पांगुळ गाड्या सारख्या गाड्या वरून अपंगच वावरत असत. कारण व्हीलचेअर अतिशय महाग असत. आजी आजोबा आजारी पडले किंवा रुग्णाने बिछाना धरला की त्यांना हाताला धरून चालवायला एखादा गडी लावत किंवा एक काठी देत.wheelchair ही पूर्वी फार श्रीमंतांची मक्तेदारी होती.
आता तर आपण बघतो, किती वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या म्हणजे दहा हजारापासून ते तीन लाख रुपयांपर्यंतच्या व्हीलचेअर औषधी दुकानांमध्ये आणि कारखान्यांमध्ये विकत मिळतात. काही काही ठिकाणी तर आजारी पडल्यावर भाड्याने सुद्धा व्हीलचेअर मिळण्याची पद्धत आहे .ह्या व्हीलचेअरची चाक वंगण युक्त,स्मूथ असल्यामुळे वर बसलेला रुग्ण आपल्या हातानेच ती सरकवून, ती व्हीलचेअर चालू शकतो. काही वर्ष पूर्वी,1990च्या काळी, ही व्हीलचेअर ढकलण्यासाठी, कुणाचीतरी आवश्यकता असायची. व्हील चेअरवर हल्ली सुविधाजनक अशा उशा आणि गाद्या ठेवल्या जातात.खाली पट्टीवर पाय ठेवायची सोय असते.बाजुला पिशवी असते.
व्हीलचेअर उतारावरून जाऊ लागली तर गरज म्हणून ब्रेक लावायची सुद्धा सोय असते. लहान मुलांची बाबा गाडी किंवा पांगुळगाडा त्याचंच सुधारित रूप म्हणजे व्हीलचेअर बनला आहे. आता तर अशी प्रगत मॉडेलची वेळ आली आहे की चेअर मधली बसलेली व्यक्ती जेव्हा एक कळ दाबते, खुर्ची फिरवली जाते.हाताने वळवले असता खुर्ची दिशा बदलते.या खुर्चीची कळ दाबली की खुर्ची किंचित उभी होते.उभे राहून लिफ्टचे बटन दाबणे, वरच्या फळीवरच काहीतरी सामान काढलं अथवा संगणकावर छपाई काम करणं ,अशी कामं सुद्धा करू शकतो. वॉकरने चाललं तर हल्ली अगदी कॉमन झालंय.जेष्ठ, गुडघ्याचे ऑपरेशन झाल्यावर काही दिवस, व्यक्ती वॉकरचे मदयीने चालत असतात.
पण व्हीलचेअरची अजूनही माणसांचे मनात भिती आहे.मनात थोडा टाबु आहे .
“असं व्हीलचेअरवर पडलेल आयुष्य कसं जगायचं ?”एक व्यक्ती असे बोललेली मी ऐकलं होतं. एका अपघातानंतर जेव्हा एकीला कंबरेत इंजेक्शन दिल्यावर घरात राहायची वेळ आली होती ,तेव्हा मी अतिशय निराश झाले होते. तेव्हा माझी एक मैत्रीण मला म्हणाली.
“ माझ्या आईची व्हीलचेअर घरात आहे तुला मी ती व्हीलचेअर आणून देईन. तु त्या व्हीलचेअरवर बसून,रेस्ट चा काळ काढ.घरातले घरात,असलेली सगळी काम करू शकशील. निराश होऊ नको.”ती
“मी बरी होईन ना?”मी
“ हो.व्हील चेअर ही माझ्या आईची अकरा वर्ष सखी होती. कारण की आई आजारी असल्यावर मुलगा असून किती काळ सेवा देणार? काम करायला येणारी बाई,ती कधी यायची, कधी यायची नाही .मी आणि आम्ही मुली आणि जावई जाऊन असे किती वेळ सेवा देऊ शकणार? त्यावेळी आई व्हील चेअर च्या साह्याने घरातल्या घरात वावरू शकली.”ती
“ आपल्या पुरते, बाथरूम ला जाणं, खिडकीशी जावून वरून रस्त्यावरची गंमत बघणे ,जमायला हव. टीव्ही पर्यंत जाऊन टीव्ही सुरू करणं ,परत जागेवर येऊन टीव्ही बघणं,हे जमाव .”मी
“आपल्या चेअर वरुन ही कामं माझी आई करायची.व्हील चेअर ही सखी असते “ती
मला तिचा हा विचार खूप आवडला. मध्यंतरी कोल्हापूरच्या एका कार्यक्रमाचे दरम्यान एका मैत्रिणीशी ओळख झाली .तिचे दोन्ही पाय काही कारणाने आजारामुळे शक्तिहीन झाले होते. ती व्हीलचेअर वरुन च सगळं काम करत होती. पण कुठल्याही प्रकारे न्यूनगंड तिच्यात नव्हता.मनामध्ये योग्य उभारी होती.देवाने कला दिली होती. राग नव्हता. नोकरी करत होती. स्वतःची काम करत होती .घर होतं संसार होता आणि तिच्या परीने तिने तिच्या अपंगत्वावर मात केली होती. पूर्वीच्या काळी पोलिओने ,अपघाताने किंवा अनुवंशिकतेने पायाची वाढ न झाल्यामुळे ,अपंग असलेल्या व्यक्ती बऱ्याच असायच्या. पायाला कॅलिपर्स म्हणजे पट्टीने लावलेल्या आधार फळ्या, काड्या ,अशा कुबडी सारखे बांधून त्या चालायच्या. अजूनही कॅलिपर्स कुबडी,कृत्रिम अवयव, संगणकीय मदतनीस असे बरेच प्रकार अपंगांना त्यांच्या अपंगत्वाशी मात करण्यासाठी आणि सोयीस्कर जीवन जगण्यासाठी मदतगार ठरतात. माझे मेहुणे मध्यंतरी अपघातात माकड हाडाच्या पाशी जखम झाल्यामुळे बिछान्यात होते. तेव्हा ते घरातच संगणकाच्या खुर्चीवर बसून घरातल्या घरात वावरत होते. दुसऱ्या मेव्हणे देशमुख ,बेलापुर यांना अर्धांगवायु झाला,तरी बाहेर फिरायला जायला,walkला जाणे खूप आवडायचे. ईतरांना त्रास नको,त्यामुळे त्यांनी फोल्डिंग ची चेअर घेतली होती आणि व्हीलचेअरच्या मदतीने एकटे,संध्याकाळी,ठराविक वेळी ते रोज साईबाबा मंदिरा पर्यंत ,belapur चालत जात असत.जेष्ठांचे समूहात गप्पा मारुन घेत,व परत येत.( दुर्दैवाने त्यांचा नुकताच काही कारणामुळे मृत्यू झाला) आपण व्हीलचेअरच्या वर बसलेल्या व्यक्तीबद्दल सहानभुती वाटु द्यावी व समाजाने पण त्या रुग्णांना मदत करावी.
रुग्णानी व्हील चेअरला आपली सखी अथवा मित्र मानून मनाची शक्ती बुलंद ठेवावी.बरे वाटले कि गरीब रुग्णाला ती व्हील चेअर दान करुन त्या रुग्णाला उमेद,उभारी द्यावी.
Recent Posts
देवांनो ! तुम्ही सुद्धा!…
October 23, 2025
No Comments
पोलिस हुतात्मा दिन
October 21, 2025
No Comments
गोष्ट ॲक्वा लाईन ट्रेनची..
October 21, 2025
No Comments
एकल शिक्षकी शाळा : देशाच्या भविष्यापुढे प्रश्नचिन्ह
October 17, 2025
No Comments
डिएला : अल्बेनियाची पहिली एआय मंत्री
October 15, 2025
No Comments


