रस्त्यावरील खड्यांना तात्पुतरता मुलामा…आ. संजय केळकर यांनी केली उड्डाणपुलावरील खड्यांची पाहणी…

आ. संजय केळकर यांनी केली उड्डाणपुलावरील खड्यांची पाहणी…

पावसाळा सुरु होत नाही तोच ठाण्यातील कापुरबावडी, माजिवडा उड्डाणपुलांवर खड्डेच खड्डे असे चित्र निर्माण झाले होते. या संदर्भात वृत्त ही प्रसिध्द झाले होते व आ. केळकर यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना इशारा दिला होता. सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला आहे. त्यानंतर येथील खड्डे बुजवण्यास सुरवात केली आहे. परंतु हे थातुरमातुर पध्दतीने खड्डे बुजविण्यात आले असून पुन्हा पाऊस झाल्यास मोठे खड्डे पडतील असा दावा भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी पाहणी दौऱ्या दरम्यान केला. त्यामुळे केवळ तात्पुरता मुलामा न लावता ठाणेकरांना चांगले रस्ते द्यावेत अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
पावसाळा सुरु झाला आणि रस्त्यांना खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. माजिवडा, कापुरबावडी उड्डाणपुलांवर खड्डे पडल्याचे चित्र दिसत आहे. कापुरबावडीचा उड्डाणपुल चढल्यानंतर नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तर पुढे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनीवर देखील खड्डे पडल्याचे दिसत आहेत. त्यातही हा रस्तां संबधित विभागाकडून पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करण्यात आली होती. एका मार्गिकेवर मास्टीकही टाकण्यात आले होते. परंतु पहिल्याच पावसाळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाची पोलखोल या निमित्ताने झाली आहे. त्यानुसार या खड्यांची पाहणी केली जाणार असल्याचे पत्र केळकर यांनी संबधीत विभागाला देखील दिले होते. त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्यास सुरवात केली आहे.
दरम्यान मंगळवारी संजय केळकर यांनी मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळ, कापुरबावडी, माजिवडा येथील उड्डाणपुलांसह येथील सेवा रस्त्यांचीही पाहणी केली. या पाहणी दौºयानंतर त्यांनी पालिका प्रशासनासह, वाहतुक विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर टिकेची झोड उठविली. सहा महिन्यांपूर्वी रस्ता तयार करण्यात आल्यानंतरही खड्डे कसे पडले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आता पाहणी दौरा करणार म्हणून तात्पुरता मुलामा लावून खड्डे बुजविण्यात आले आहेत. मात्र पुन्हा पाऊस झाला तर याठिकाणी खड्डे पडतील अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यावर यावर चांगला उपाय करावा अशी मागणीही त्यांनी केली.
तर घोडबंदर भागात सध्या मेट्रोची कामे सुरु आहेत. त्यामुळे या भागात वाहतुक कोंडी होत आहे. परंतु येथील सेवा रस्ते आजही मोकळे नसल्याचे पाहणीत त्यांना निदर्शनास आले. सेवा रस्त्यांवर वाहने पार्क केली जात आहेत, शो रुम वाल्यांची वाहने येथील रस्त्यावर लागलेले आहेत. त्यामुळे त्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. दुसरीकडे ठाणे शहरातील नाले सफाईची कामे अद्यापही पूर्ण झाली नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

Leave a Comment

× How can I help you?