दिव्यातील तलाव मृत अवस्थेत

ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. याच ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील दिवा शहर मात्र याला अपवाद ठरले आहे. दिवा स्टेशनच्या लगत तलाव असून हा तलाव रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली अर्ध्यापेक्षा जास्त तलाव बुजवला गेलेला आहे. त्यातच हा स्टेशन लगत तलाव असून तलावाच्या सुशोभीकरण करण्यासाठी करोडो रुपये महापालिकेने खर्च केले. मात्र प्रत्यक्षात या तलावाची अवस्था एकदम बिकट आहे. या तलावाचे सुशोभीकरण झाले नसून यातील साधा कचराही महापालिकेकडून उचलला जात नसल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.

दिवा विभागात तीन तलाव असून सर्व तलावांची अवस्था बिकट आहे. दिवा स्टेशन लगत तलाव, दातिवली तलाव,आगासनगाव तलाव या तलावासाठी ठाणे महानगरपालिका कडून गेल्या पाच वर्षात करोडो रुपयांची निधी आली परंतु अधिकारी आणि ठेकेदार यांच्या साटेलोटे असल्यामुळे येथील तलावांचे सुशोभीकरण न होता फक्त खोटी बिले काढून महापालिकेला लुटण्याचेच काम करण्यात आले आहे. तरी सदर तलावांच्या निधीचे थर्ड पार्टी ऑडिट करून सदर ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी रोहिदास मुंडे यांनी केली आहे.

Leave a Comment

× How can I help you?