विशाळगडावर भरपावसात घोषणाबाजी, तोडफोड, लाठीचार्ज

कोल्हापूर : विशाळगड अतिक्रमण वाद  चिघळल्याची परिस्थिती आज रविवारी निर्माण झाली. संपूर्ण दिवसभर परिसरात तणावाचं वातावरण होतं. दोन वेगवेगळ्या आंदोलनांमुळे या परिसरात अनेक कार्यकर्ते जमा झालेले होते. यातील संतप्त कार्यकर्त्यांनी विशाळगड परिसरात आक्रमक भूमिका घेतली. यावेळी मोठं नुकसान जमावाकडून करण्यात आले. पोलिसांची ही सर्व परिस्थिती हाताळताना दमछाक झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी राजे छत्रपती आणि रवींद्र पडवळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनातील कार्यकर्त्यांची विशाळगड परिसरातील अतिक्रमण हटाव ही भूमिका होती. यासाठी मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते जमलेले होते. अनेक शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देखील दिल्या. त्याचबरोबर काहींनी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा अशी मागणी प्रत्येक कार्यकर्त्याची होती. संभाजीराजे छत्रपती देखील स्वतः या पायथ्याशी बसलेले होते. ही पूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांची दमछाक झाल्याचे देखील पाहायला मिळत होतं.

पोलीस प्रशासनांकडून सर्व जमावाला शांततेचा आवाहन करण्यात येत होतं. मात्र तरी देखील अचानक एका जमावाने आक्रमक भूमिका घेत परिस्थिती चिघळवली. दरम्यान पोलिसांनी  लाठी चार्ज देखील केला. अनेक कार्यकर्त्यांची धर पकड करण्यात आली. शिवाय जमावाला पांगवण्याचा प्रयत्न ही केला गेला. मात्र संतप्त जमावासमोर प्रशासनाने देखील हात टेकले. पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की या संपूर्ण तणावपूर्ण परिस्थितीमध्ये ज्या लोकांचा हात आहे त्याच्यावर कारवाई करणार. यापूर्वी काहींना नोटीस देखील दिली असल्याचं सांगितलं. सध्या ही सर्व परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली आहे असेही पंडित म्हणाले.

 

Leave a Comment

× How can I help you?