ठाणे : आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचा कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थ्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी व आपल्या परंपरेचे जतन करताना आनंद विश्व गुरुकुलच्या प्रांगणात महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठुरायाच्या पालखीचा सोहळा आयोजित करण्यात आला.
शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे यांच्या हस्ते माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करत या आनंद सोहळ्याची सुरुवात केली. आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा हर्डीकर, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या मयुरी पेंडसे यांनी देखील माऊलींच्या प्रतिमेचे पूजन केले. या सोहळ्या प्रसंगी भजन कीर्तनाच्या जल्लोषात लेझीम पथकाच्या जोशात दिंडीची फेरी आनंद विश्व गुरुकुल ते रहेजा गार्डन मार्गे काढण्यात आली. नर्सिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी देखील या दिंडी सोहळ्यात सामील झाल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारीक खेळाचे प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करत गजर कीर्तनाच्या जयघोषात विठूरायाच्या नावाचा गजर केला. प्राचार्यांनी, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी वारीची अनुभूती घेत फुगडी व रिंगण सोहळा पार पाडला.
पालखी सोहळ्याची सांगता मान्यवरांच्या हस्ते विठुरायाच्या आरतीने करण्यात आली.
या वारी सोहळ्यात विद्यार्थ्यांबरोबर उप प्राचार्या दिपिका तलाठी, पर्यवेक्षक प्रा. सागर जाधव, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी देखील सामील झाले होते. वागळे इस्टेट पोलिस कर्मचाऱ्यांनी देखील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत दिंडी यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. दिंडीचे मार्गक्रमण होत असताना परिसरातील सर्व नागरिकांनी कौतुक केले.