शिवसैनिकाच्या हत्येचा आरोपी 9 वर्षानंतर जेलबाहेर; शिंदे सेनेच्या तालुकाप्रमुखाने केले स्वागत

अंबरनाथ : रमेश उर्प पप्पू गुंजाळ हे अंबरनाथचे शिवसेनेचे नगरसेवक होते. 2015 साली त्यांची त्यांच्या घराशेजारी हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुरुनाथ उर्प अण्णा गायकर याला अटक केली होती. तब्बल 9 वर्षानंतर त्याला जामीन मंजूर झाला. जामीन मिळाल्यानंतर जेलबाहेर त्याचे स्वागत करण्यासाठी एकच गर्दी झाली होती. यावेळी शिंदे गटाचे तालुकाप्रमुख महेश पाटील हेदेखील त्याच्या स्वागतासाठी जेलबाहेर आले होते. गायकर-पाटील यांच्या या दोस्तान्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या. एका शिवसैनिकाच्या खुनाचा आरोप असलेल्या आरोपीच्या स्वागताला दुसरा शिवसैनिक पोहचतो हे पाहून अंबरनाथमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
गुरुनाथ उर्प अण्णा गायकर हा गुंजाळ यांच्या हत्ये प्रकरणात जेलमध्ये होता. त्याला 9 वर्षानंतर जामीन मिळाला. तो जेल बाहेर येणार म्हणल्यावर त्याच्या पंटर लोकांनी जेलबाहेर मोठी गर्दी केली होती. त्यात तरूण वर्ग मोठ्या प्रमाणात होता. एखादी व्यक्ती मोठी कामगिरी करून, जशी परत येते आणि त्याचे स्वागत होते तशीच स्वागताची तयारी करण्यात आली होती. यात एक व्यक्ती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती ती होती शिंदेगटाचा कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुख महेश पाटील. गायकर बाहेर येताच महेश पाटील यांनी त्याला जणू जिवलग मित्र असल्यासारखे अलिंगन दिले. यावेळी पाटील आणि गायकर यांच्यात हास्यविनोद होतानाही दिसत होते.
ज्याने शिवसेनेच्या नगरसेवकाची हत्या झाली, त्याच्याच स्वागताला दुसरा शिवसैनिक गेल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त होत आहे.विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवरही गायकर याला जामीन मिळालाच कसा याचीही चर्चा आता रंगली आहे.

Leave a Comment

× How can I help you?