स्वाभिमानी भैय्यालाल भोतमांगे परिवारातील सहचारिणी सौ.सुरेखा, सुकन्या प्रियंका, चिरंजीव सुधीर , चिरंजीव रोषणची हत्या ही साक्षात मानवतेची हत्याच होती. पोलिस बनण्याचं स्वप्न होतं सुकन्या प्रियंकाचं! गिधाडांनी तीचं स्वप्न अक्षरश सोलून खाल्लं… मृत्युनंतर तरी भैय्यालाल भोतमांगे परिवाराला न्याय मिळेल असं वाटलं होतं. नागपूर, मुंबई, दिल्लीच्या दरबारी जीव मुठीत धरून न्यासाठी आकंदन करीत होता.पण नाही न्याय मिळू दिला इथल्या मुजोर व्यवस्थेनं. ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. शिक्षा झाली. पण पळवाटेला हमरत्ता बनविण्याची तजबीज झाल्याने, गिधाडे जामिनावर सुटले.

गिधाडांचे गावात जंगी स्वागत… शाही मिरवणूक… छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात असं आमच्या वाचनात आले नाही. डायरेक्ट टकमक टोकावरून कडेलोट.! खैरलांजीच्या जखमा ब्रया व्हाव्यात म्हणून बुद्धाकडे पहातो आहे.तरीही प्रकर्षाने मानव मुक्तीचे प्रणेते, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संवेदनशील भावनेने भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून संवेदनशील विचारांचं संविधान प्रस्ताविका शिल्प, आम्ही ‘भारताचे लोक’..उद्देश समोर उभं रहातं.. ! नको नको म्हणता सामाजिक उत्थानासाठी श्रमणारे हात लिहिते होतात.29सप्टेंबर 2006 आजच्या दिवशी 18 व्या वर्षी दुर्घटना घडली तेव्हा देशाच्या आर्थिक राजधानीत भोंडला खेळला जात होता. रक्तरंजीत टाहो ऐकू का येत नव्हता?

देशाच्या राजधानी दिल्लीतील ‘निर्भयाच्या’, आरोपींना फाशी झाली.शासनव्यवस्था सकारात्मकता जपते आहे हे पाहून आम्हाला समाधान वाटलं. परंतू खैरलांजीतील भैय्यालाल भोतमांगे शेवटच्या श्वासापर्यंत राज्यकर्ते व न्याय व्यवस्थेकडे भीक मागत हिंडले. पण न्याय मिळाला नाही.”भैय्यालाल दादा” हरले. ! अन् न्यायालयीन लढा देत हतबल झाले.डोळयासमोरचा आगडोंब उरात धडका मारत होता.नीद्रानाशाने ह्रदयस्पंदनाचे ठोके वाढले.यात दुर्दैवाने अंत झाला. आजच्या दिवसाचं आक्रित सांगताना ‘भैय्यालाल भोतमांगेदादां’ अनेक सवाल मागे सोडून गेले, त्याचे काय? प्रतिशोध घेताना काळाची गरज म्हणून जात -धर्म -पंथ -भाषा, यांच्या मर्यादा ओलांडून यापुढे फक्त “माणूस आणि मानवताधर्म “,याचाच विचार व्हायला हवा.गावकुसाबाहेरच्या माय लेकींना, भावंडांना सन्मानाने जगता येईल अशी व्यवस्था आजच्या सत्ताधिशांनी निर्माण करावी असे आम्हाला वाटते.सर्वावर सारखीच सावली धरणा-या निसर्गाच्या प्रती या क्षणी कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते.कारण विषमतामूलक, विशिष्ट समाजाला लक्ष करून द्वेष पसरवत कर्मकांडातून पाशवी शक्ती एकवटून सामूहिक बलात्कार करून हत्या करण्याचं पाप दानवालाही जमले नसते. असं आम्हाला वाटतं.

हे ‘तथागत बुद्धा’ उघड डोळे…
बघ… काय सुरु आहे तुझ्या भारत भूमीवर…
बहुजन पालक ‘छत्रपती शिवाजी राजे’ बघा उघड्या डोळ्यांनी, फक्त भाळावर चंद्रकोर काढणं म्हणजे तुमचा कल्याणच्या सुभेदाराच्या सूनेची खणानारळाने आपल्या मातेसमान लेखत ओठी भरत सन्मानित करण्यासारखा आपला विचार आजही प्रेरणादायी समजावून सांगणं गरजेचं आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील माता भगिनींना संपवणे आपणास सहन झालेही नसते. श्रीमंतयोगी राजे फंदफितूरीचा आपण अगोदर कडेलोट केला असता..! अन् गुन्हेगारांना माहूताच्या पायी घातलं असतं..

क्रांतिसूर्या… हे संविधानकारा
‘लोककल्याणकारी’ राज्य म्हणतात ते यालाच का? तुम्ही आपलं उभं आयुष्य पणाला लावलं, स्वतच्या लेकरांची चिंता केली नाही.शेवटपर्यंत मातीत मळलेल्यांना उचलून घेण्यासाठी मूकनायक बनलात.आणि आपल्या नावावर काही गब्बर झाले त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 21व्या शतकातील युवापिढीने संवेदनशील भावनेने राष्ट्रीय एकात्मता जनजागृती अभियान राबविण्यात यावे.
स्वातंत्र्य,समता, बंधुता,न्याय ही संविधानिक मूल्ये लायब्ररीच्या बुकातच बंद केली आहेत का हो? कधी घेणार ती मुक्त श्वास ?
सांगा , आपण तीघेही सांगा…
आता रडावं कोणा कोणासाठी?
कोठे आहेत माझ्या डोळ्यात अश्रू?
संगर कसा करणार? बेकीच्या जमान्यात?
विझू नका बांधवांनो आपल्या न्याय हक्कासाठी.राखेतून गरूड भरारी घ्या. भस्म करायला त्या कूर पासवी गिधाडांच्या छाताडावर बसण्यासाठी.
कोरड्या पापण्यांतून विद्रोहाच्या ठिणग्या निघाल्या तरी निघू द्या. मानवी आयोग,जातीय आयोग, संघर्ष समित्या अस्तनितील निखारे ओळखा.
अन्यायाला वाचा फोडणाऱया निखाऱयांनी पेट घेतला तर कदाचित ब्लॅक कॅट पॅंथर उभं राहतील.! आशा संवेदनशील आस्थेला उजागर करतांना सर्व भारतीयांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देणा-या आपल्या संविधान निर्मात्याने समाजवादाचा कायदेशीर मार्ग लोकशाहीत राज्यघटनेच्या चौकटीत स्वातंत्र्य देवून अंगिकारण्याचे भारतीय दंड संहिता म्हणून कलमात लिहिले.त्याची कठोर अंमलबजावणी व्हावी म्हणून ‘संविधानीक अधिकार’ नव्याने रूजविण्यासाठी जागर करणं आवश्यक आहे. जागल्या म्हणून गस्त घालताना घडवून आणलेल्या घटनांचा जाहीर निषेध करताना, बहूजनांच्या लेकरांनी मी व माझे घर व माझा परिवार एवढेच सीमीत न राहता संघटीत व्हायलाच हवं.!

‘भावपूर्ण अभिवादन सौ. सुरेखाताई, प्रियांका, रोशन, सुधीर, भैय्यालाल भोतमांगे दादा..!’

समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे
महाराष्ट्र शासन, पत्रकार मुंबई

Leave a Comment

× How can I help you?