नेपाळमध्ये भारतीय हिंदू चिंताग्रस्त

संपूर्ण जगात नेपाळ हे हिंदू राष्ट्र म्हणून मानले जाते. त्यामुळेच भारतीयांना नेपाळबद्दल एक वेगळेच प्रेम. भारत आणि नेपाळ या दोन्ही देशातील लोकांमध्ये रोटी-बेटीचे नाते होते. जनकपूर धाम हे नेपाळमध्ये आहे, जे प्रभू रामाचे सासर मानले जाते. जनकपूर ही जुन्या मिथिला राज्याची राजधानी. भारतातील हजारो हिंदूंचे नेपाळमध्ये व्यवसाय आहेत. सीमावर्ती शहरांमधील जवळपास सर्व व्यवसाय भारतातील हिंदूंच्या हातात आहे. नेपाळमधील 80 टक्के लोकसंख्या हिंदू आहे. पण आधी धोरणात्मक कारणांमुळे भारतीय लोकांनी नेपाळी नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर भारतातील हिंदूंनाही लक्ष्य केले जाऊ लागले. परिस्थिती एवढ्या पातळीवर पोहोचली आहे की, भारतातील हिंदू-मुस्लिम यांच्यातील फूट तिथेही पोहोचली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हिंदू आणि मुस्लिमांमध्ये मोठा वाद झाला होता, त्यामुळे उत्तर प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या नेपाळगंजमधील बांके शहरात अनेक दिवस कर्फ्यू लागू करण्यात आला होता. वास्तविक कोणीतरी इंटरनेटवर इस्लामबद्दल काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता. याविरोधात मुस्लिमांनी निदर्शने केली. दुसऱया दिवशी हिंदूंनी शांतता मिरवणूक काढली तेव्हा मिरवणुकीवर हल्ला झाला. जोरदार दगडफेक आणि गोळ्या झाडण्यात आल्या. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात हिंदू भगवे झेंडे घेऊन पळत आहेत आणि त्यांच्यावर दगडफेक केली जात आहे.

नेपाळमधील 80 टक्के लोकसंख्या हिंदू असूनही तेथील भारतीय हिंदूंची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. भारतातील लोकांशी भेदभाव केला जात आहे, त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. भू-राजकीय कारणांमुळे नेपाळच्या एकापाठोपाठ आलेल्या सरकारांनी भारताबाबत शत्रुत्वाचे धोरण स्वीकारले आहे. सीमावादावरून दोन्ही देशांमधील तणाव वाढला असतानाच चीनच्या हस्तक्षेपामुळे नेपाळमध्ये भारतविरोधी भावना भडकल्या आहेत. कुठल्या ना कुठल्या प्रकारे तिथले व्यवसाय सांभाळणारे भारतातील हिंदू आपले उद्योगधंदे बंद करून भारतात परतत आहेत.

गतवर्षी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर अचानक अशी परिस्थिती उद्भवली ज्यामुळे भारतीय आणि हिंदूंचे मोठे नुकसान झाले. नेपाळने भारतीय चलनावर एकतर्फी बंदी घातली. 100 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सर्व चलनांवर बंदी घालण्यात आली आहे. 100 रुपयांच्या वरच्या खरेदीवर लक्ष ठेवले जात असून त्यावर कर आकारला जात आहे. भारतीय चलन रुपयाचे नेपाळी रुपयाच्या तुलनेत झपाट्याने अवमूल्यन होत आहे. भारतीय कायद्यानुसार भारतीय नागरिक 25 हजार रुपये रोख घेऊन नेपाळमध्ये जाऊ शकतात, मात्र आता नेपाळ हा नियमही पाळत नाही. 25,000 रुपये रोख ठेवल्याबद्दल नेपाळमध्ये तुम्हाला अटक केली जाऊ शकते. नेपाळच्या या वृत्तीमुळे सीमेवरील हिंदूंच्या शेकडो कोटी रुपयांच्या दैनंदिन व्यवसायावर परिणाम होत आहे. नोव्हेंबर 2016 च्या नोटाबंदीनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत दोन्ही देशांत चर्चा झाली, पण तोडगा निघू शकला नाही. एकूणच नेपाळचे हे हिंदूविरोधी धोरण चीनच्या पथ्यावर पडत आहे.

: मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment

× How can I help you?