‘रोम जळत असताना
राजा निरो शांतपणे
फिडेल वाजवत होता’
असं इतिहासात घडल्याचं वाचलं होतं…
खरं-खोटं करण्याच्या नादात
पडलोच नाही कधी…
आता एकविसाव्या शतकात
इकडे भारतात मणिपूर
पाचशे सहासष्ट दिवस जळत असताना
आमचा ‘नरेश’ तिकडे परदेशात
परदेशस्थ भारतीयांचे कोडकौतुक
स्वीकारत फिरत आहे…
कसे म्हणू माझा देश महान आहे?
तिकडे द्वेषाच्या आगीत
मणिपूर मेणासारखा वितळत आहे,
भाकरीच्या त्रासाने मुले रडत आहेत
आणि
आमचा ‘नरेश’ दूर परदेशात
करारनामे करण्यात दंग आहे…
बहिण ‘लाडकी’ असो वा
असो ‘लाडली’ बहेन,
अपमान तिचा सर्वत्रच आहे;
लहान मुले, तरुण, वृद्धांचा जत्था
यात
बळी पडत होत्या दोन तरुणी;
इकडे सदरे पसरवत महिलांकडूनच
आमचे नेते करत होते मतपेरणी…
‘नरेशा’ने सगळीच लाज सोडली आहे
परदेशात मुलींच्या नृत्यात रमतो आहे
आम्हीही इकडे सगळे विसरून
आमच्या जगात मजेत आहोत
कारण आमचा ‘अमृत काल’ सुरू आहे…
देशात परिवर्तन झाले, रामराज्य आले
म्हणून सर्वत्र जयघोष झाला
पण या रामराज्यातही
सीतेवरील अत्याचार थांबलेच नाहीत…
जाते बळी जेव्हा एखादी सीता
तेव्हा आम्ही
तेवढ्यापुरता काढतो कँडलमार्च
दुसऱ्या दिवशी सगळे विसरून
धावतो आपापल्या ‘भाकरी’च्या मागे…
यथा राजा तथा प्रजा
ही म्हण आता आमच्यात चांगलीच रुजली आहे
म्हणूनच आम्हीही
थंड, सुस्त प्रशासनाप्रमाणेच आता
अशा घटनांकडे बघत बसतो,
कारण आमचा ‘नरेश’
आता परदेशातच जास्त रमत असतो …
मनीष चंद्रशेखर वाघ