प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे येथील पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान येथे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींचा सत्कार यावेळी करण्यात आला.
सन 2022-23 या वर्षामध्ये जिल्हा परिषद गटातील एकूण 53 गटामध्ये स्पर्धा राबविण्यात आली होती. जिल्हा परिषद गटामधून जिल्हा स्तरावरील स्पर्धेत वडपे ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला असून 6 लाख रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कल्याण तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायतीने दुसरा क्रमांक पटकावला असून 4 लाख रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
भिवंडी तालुक्यातील मोरणी ग्रामपंचायतीने तिसरा क्रमांक पटकावला असून 3 लाख रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
घनकचरा, सांडपाणी व मैला गाळ व्यवस्थापन या कामात विशेष स्व.वसंतराव नाईक पुरस्कार भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत म्हाळुंगे 50 हजार रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवळी 50 हजार रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
शौचालय व्यवस्थापन या कामासाठी स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत आवळे 50 हजार रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील आर.आर. पाटील जिल्हा व तालुका सुंदर गाव पुरस्कार देऊन 10 ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात आला. कल्याण तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायतीस जिल्हा सुंदर गाव पुरस्कार, भिवंडी तालुक्यातील कुसापूर ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, शहापूर तालुक्यातील भावसे ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, मुरबाड तालुक्यातील पेंढरी ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, अंबरनाथ तालुक्यातील साई ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मुरबाड तालुक्यातील फांगुळगव्हाण ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, भिवंडी तालुक्यातील डोहाळे ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, शहापूर तालुक्यातील वाशिंद ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, कल्याण तालुक्यातील पळसोली ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, अंबरनाथ तालुक्यातील ढोके दापीवली ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ.डी. स्वामी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
