प्रजासत्ताक दिनी दिव्यांगांचे ठाणे महापालिकेसमोर अर्धनग्न आंदोलन

गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने मागणीपत्र देऊनही ठामपा अधिकाऱ्यांकडून कार्यवाही होत नाही. त्या निषेधार्थ अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे निमंत्रक मोहम्मद यूसुफ मोहम्मद फारुक खान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगर पालिके समोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. ठामपा उपायुक्त श्रीमती कदम यांनी दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

संविधान आणि दिव्यांग अधिकार अधिनियम २०१६ अन्वये या दिव्यागांचे पुनःर्वसन करणे आणि त्यांच्या उत्थानासाठी काम करणे ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ठाणे महानगर पालिकेची जबाबदारी आहे.मात्र, ठाणे महानगरपालिका या जबाबदारीकडे दुर्लक्ष करीत आहे. ठाणे शहरातील दिव्यांगांनी आपले उदरनिर्वाह करण्याबाबत व्यवसायासाठी स्टाॅल देण्याचे अर्ज केले आहेत. मात्र, त्यांना अद्याप स्टाल/टपरी, गाळे उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. ठामपाकडून नवीन दिव्यांग स्टाल मंजूर झालेले नसल्याने जे दिव्यांग स्टॉल लावत आहेत, त्यांच्यावरील कारवाई रहित करावी; ज्या दिव्यांगांच्या स्टॉलवर कारवाई केली आहे. त्यांना स्टाॅल परत करण्यात यावेत; लवकरात लवकर दिव्यांगांना नवीन स्टाॅल देण्यात यावेत; २०२३-२४ आणि २०२४-२५ चे दिव्यांगांचे अनुदान ठाणे महानगर पालिका यांनी लवकरात लवकर वाटप करावे.;दिव्यांग ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या घराचे फोटोपास काढून नोंदणी करावी; दिव्यांगांना टॅक्स व पाणी बिल मध्ये ५० टक्के सुट द्यावी; ठाणे महानगरपालिका ५टक्के स्विकृत नगरसेवक, तसेच विविध समित्यांवर दिव्यांग सदस्य म्हणून नेमणूक करावी.आणि शासनास मंजुरी साठी प्रस्ताव पाठविण्यात यावी; ठाणे महानगर पालिका समाज विकास विभागातील भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यांवर दिव्यांग अधिनयिम २०१६ नूसार कलम ९२ अन्वये कारवाई करुन त्याजागी सक्षम अधिकारी यांची नेमणुक करावी; राज्यात अनेक बोगस दिव्यांग कर्मचारी बोगस उघड होत आहे.ठामपा बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची दिव्यांग फेर तपासणी करावी, दि.०३.१२.२०१८ रोजी ज्या दिव्यांगव्यक्ती व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून दिली असता सदर जागा व्यवसायभिमुख नसल्याने व्यवसाय होत असलेली जागा बदली करून द्यावी आदी मागण्यांसाठी 2 ऑक्टोबर रोजी रोजी ठाणे महानगरपालिका समोर मुंडन करून आंदोलन केले होते.

अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आश्वासन नंतर तूर्तास आंदोलन स्थगित केले असता आजतागायत सदर आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नसल्याने प्रजासत्ताक दिनी ठामपा मुख्यालयासमोर दिव्यांगांनी हे अर्ध नग्न आंदोलन केले.

समाज विकास विभागाच्या उपायुक्त अनघा कदम यांनी आंदोलकांची भेट घेऊन आयुक्तांसोबत बैठक घेण्यात येईल; तसेच, दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी चार दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास आयुक्तांच्या दालनासमोर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मोहम्मद यूसुफ मोहम्मद फारुक खान यांनी दिला.

Leave a Comment

× How can I help you?