१० शक्तिशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर; मोदींच्या कारभारावर देश-विदेशातून टीका

फोर्ब्सने जगातील १० सर्वात शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली आहे, भारत या यादीतून बाहेर पडला आहे. फोर्ब्स २०२५ च्या या नवीन यादीत, अमेरिका टॉप १० मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. इस्रायलने टॉप १० मध्ये दहावे स्थान पटकावले आहे. मोदी राजवटीत भारतासाठी हि आणखी एक वाईट बातमी आहे.

शक्तिशाली देशांच्या यादीतून भारताचे नाव गायब झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जगभरातून टीका होताना दिसत आहे. या यादीत अमेरिका अव्वल स्थानावर आहे, तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय, चौथ्या क्रमांकावर ब्रिटन, पाचव्या क्रमांकावर जर्मनी, सहाव्या क्रमांकावर दक्षिण कोरिया, सातव्या क्रमांकावर फ्रान्स, आठव्या क्रमांकावर जपान, नवव्या क्रमांकावर सौदी अरेबिया आणि दहाव्या क्रमांकावर इस्रायल आहे.

फोर्ब्सने भारताला टॉप २० सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीतून वगळले आहे. या यादीत भारताऐवजी सौदी अरेबियाचे नाव समाविष्ट आहे. अशा परिस्थितीत फोर्ब्सच्या यादीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

फोर्ब्सने ही यादी
आघाडीच्या देशांच्या नेत्यांचा प्रभाव आणि निर्णय घेण्याची क्षमता.
आर्थिक परिणाम: देशाची आर्थिक स्थिती आणि जागतिक
व्यवसायातील भूमिका. राजकीय प्रभाव: आंतरराष्ट्रीय राजकारणात देशाची भूमिका
मजबूत आंतरराष्ट्रीय युती:
इतर देशांसोबत मजबूत भागीदारी आणि सहकार्य.
देशाची मजबूत सेना,
लष्करी ताकद आणि संरक्षण क्षमता. या पॅरामीटर्सवर तयार केली आहे.

रुपयाच्या कमकुवतपणाचा परिणाम अनेक क्षेत्रांवर स्पष्टपणे दिसून येतो. रुपया कमकुवत झाल्यामुळे आयात केलेल्या वस्तूंच्या म्हणजेच परदेशातून भारतात येणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढतील. यामध्ये खाद्यतेल, डाळी आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. आयातीचा खर्च वाढल्याने या वस्तूंच्या किमतीही वाढतील, ज्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत महागाई वाढेल.

सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपयात मोठी घसरण झाली. व्यवहाराच्या सुरुवातीला, रुपया ६७ पैशांनी कमकुवत होऊन ८७.२९ प्रति डॉलरवर पोहोचला, जो आतापर्यंतचा नीचांकी दर आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, कॅनडा आणि मेक्सिकोवर मोठ्या प्रमाणात कर लादल्यानंतर व्यापार युद्धाच्या भीतीमुळे जगभरातील शेअर बाजारात रुपयाची ही मोठी घसरण दिसून येत आहे. यामुळे भारतीय रुपयातही मोठी घसरण झाली.

Leave a Comment

× How can I help you?