महाराष्ट्र म्हणजे देशातील राजकीय कुस्तीचा आखाडा झाला आहे.महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. तेंव्हापासून ते आजपर्यंत झाले नसेल तेव्हढे राजकीय नैतिकता रसातळाला गेली हे मान्यच केले पाहिजे.
संपूर्ण राज्यपातळीवर बहुतेक पक्षांची राजकीय समीकरणे मुळापासून बदललि.त्याला कारण होते भाजपने शिवसेना व राष्ट्रवादी पक्षात पाडलेली फूट.तसेच सरकारी यंत्रणांना हाताशी धरून,उद्भव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मूळ पक्षाचे नाव आणि चिन्ह काढून घेतले.आणि वर त्यांनाच नकली ठरवून हिणवले.
हे सगळं करण्यामागे एकच राजकीय गणित होते.ते म्हणजे मतांची टक्केवारी.भाजपला महाराष्टात साधारणपणे ३२ ते ३४ टक्के मते जास्तींत जास्त मिळतात.भाजपला विजयासाठी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मते पाहिजेत.
एकूणच त्यातून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची उपयुक्तता मर्यादित असल्याचे लक्षात आले.आणि त्यामुळे राज ठाकरे यांनासुधा जोडून नुकसान भरून काढण्याचा भाजपने प्रयत्न केला.
परंतु उद्भव ठाकरे मात्र काही आटोक्यात आले नाही,हे महाराष्ट्रात झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत लक्षात येते.त्यासाठी उद्भव ठाकरे यांचे ममुद हर फॅक्टर यशस्वी होताना दिसतो.हा फॅक्टर असाच चालला तर मुंबईतील ठाकरे गटाच्या चारही जागा जिंकून आल्यास आश्चर्य वाटायला नको.
ममुद फॅक्टरमधील पहिले अक्षर आहे म म्हणजे मराठीचा.महारष्ट्र विरुद्ध गुजरात म्हणजेच मोदी-शाह विरुद्ध ठाकरे असे राजकीय धारणा तयार झाली आहे.गुजरात महाराष्ट्राचे उद्योग पळवतोय. मुबईत मराठी माणसाची गळचेपी करतोय.अदानी-अंबानी आपले मराठी महाराष्ट्राचे शोषण करते आहे.
हे वास्तवच आहे त्यामुळे मराठी माणूस हा एकत्र आला आहे.उद्भव ठाकरे यांचा मोदी-शहा विरोधात असलेला ठामपणा,मराठी माणसाला भावला आहे. त्यात कोरोना काळात घेतलेली धीरोदात्त भूमिका. आणि शिवसेना फोडल्याने त्यांच्याविषयी असलेली सहानभूती शेवटपर्यंत टिकून राहिली.
त्यामुळे मराठी मतांची मोठी टक्केवारी उद्भव ठाकरे यांच्या पाठीशी राहील यात काही शंकाच नाही.त्यात मराठी माणूस नोकरीला नको ही जाहितात प्रकरण आणखीन भरीला पडले आहे.नुकतेच काही खुलासे आले आहे की,ते प्रकरण खोटे आहे.परंतु ग़ुजराथी समाज आणि व्यापारी हे मराठी माणसाचा घर देण्यापासून द्वेष करतात.
आणि मराठी पाट्या लावण्याला विरोध करायला.विरेन शाह हा गुजराथी अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला.भाजपचा नेता किरीट सोमय्या जाणीवपूर्वक मराठी राजकारणी नेत्याना लक्ष करत राहिला. हे काही लपून राहिला नाही हे कोणीही मान्य करेल.
याचा परिणाम महाराष्ट्रातील मोठी बहुभाषिक शहरे आणि ग्रामीण भाग यात मराठी मतांवर झाला आहे.ग्रामीण भागात आमचा रोजगार गुजरातला गेला यामुळे संताप आहे.
एकूणच महाराष्ट्रात शिवसेनेचे आमदार आणि खासदार गेले असले ,तरी कार्यकर्ते आणि मतदार मात्र त्याप्रमाणात गेले नाहीत.कारण लोकसभा निवडणुकीत उद्भव ठाकरे यांचा चेहरा आणि त्यांचे उमेदवार हेच रेसमध्ये असल्याचे प्रत्येक राजकीय विश्लेषण यातून स्पष्ट झाले.
त्यामुळे भाजपपेक्षा मोदी-शाह याना विरोध करण्यासाठी,डावे,समाजवादी आणि आंबेडकरी चळवळीतील मराठी माणूस उद्भव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहिला आहे.
पुढील भागात आपण मु आणि द याबद्दल चर्चा करुया.आपला महाराष्ट्र डिजिटल न्यूज पोर्टलला नक्की भेट द्या.
लेखक -अॅड. मनोज वैद्य