महाराष्ट्रात गुजराथी आणि मारवाडी यांचे व्यावसायिक क्षेत्रावर सुरुवातीपासून वर्चस्व आहे. अगदी महाराष्ट्रातील बऱ्यापैकी मोठ्या गावापासून ते जिल्ह्याच्या ठिकाणापर्यंत किराणा मालापासून ते होलसेल सगळा व्यापार बहुतेक गुजराती-मारवाडी समाजाच्या हाती आहे.काळानुरूप दुचाकी/चारचाकी यांच्या डीलर्सशिप यांनीच मिळविल्या.
आर्थिक नाड्या हाती असल्याने,सुरुवातीला सरपंच,आमदार ही पदेसुद्धा मिळवली.जसे स्थानिक अस्मिता गडद झाल्या.त्यानुसार त्यांनी धोरण म्हणून, राजकीय इच्छाशक्तीला आवर घातला.आणि आपली स्थानिक पातळीवर प्यादी तयार केली.
अस म्हणतात जेव्हा युद्धाला लष्कर निघत असतं,तेंव्हा त्यामध्ये सोबत बाजारपेठ असायची. अगदी सैन्यालाच काय राजालासुद्धा व्याजाने पैसे हा गुजराती-मारवाडी देणारे व्यापारी,त्या लष्करी व्यवस्थेचा भाग होते.त्यामुळे शेकडो वर्षापासून आपल्या रक्तात संघर्ष,कारण मराठी माणसांनी अटकेपार झेंडे लावले.तर त्यानी व्यापारच केला.
आता कुठे मराठी डीएसके,अविनाश भोसले व्यापार शिकले.तर त्यांना तुरुंग दाखवला.नितीन देसाई याना आत्महत्या करायला भाग पाडले. यासाठी सत्तेचा आणि त्यांच्या यंत्रणाचा मराठी उद्योजकाना संपविण्यासाठी पधतशीरपणे वापर केला गेला.
त्याचवेळी याच यंत्रणांच्या मदतीने नीरव मोदी, मेहुल चोक्सी असे अनेक गुजराती व्यापारी परदेशात पळून गेले.आपल्यातील मराठी उद्योजकाना किरीट सोमय्या टार्गेट करत होते.ते भाजपमधील अनेक मराठी पदाधिकाऱ्याना पटत नव्हते.परंतु भाजपवर गुजराती पकड इतकी घट्ट असल्याने.भाजपचे मराठी नेते आपल्या राजकीय भविष्याची चिंता असल्याने बघ्याची भूमिका घेऊन गप्प बसले.
उलट काहींनी तर अशी भूमिका घेतली की,कर नाही तर डर कशाला?जा चौकशीला सामोरे.पण त्यांच्या डोळ्यासमोर हेच गुजराथी सगळे कायदे नियम धाब्यावर बसबूम,महाराष्ट्राला लुबाडत होते यावर मात्र ब्र काढत नव्हते.
आता तर भावेश भिंडे (त्याच्या कंपनीचे नावच गुज्जू आहे बघा काय स्पिरिट आहे)याने आपले बेकायदेशीर महाकाय होर्डिंग मुंबईच्या छाताडावर उभारून,सोळा लोकांचे प्राण घेतले.हा व्यापारी मूळचाकच्छ -गुजरातचा.पण मुद्दा आहे सगळे कायदे नियम धाब्यावर बसवून.आपल्याच मराठी राज्यात पैसे कमविण्यासाठी,याना आमचे निरपराध लोकांचे जीव का घेतात.पैसे वाचविण्यासाठी हलके काम करायचे आणि जास्त नफा मिळवायचा हे यांचे धंद्याचे कायम सूत्र राहिले.
त्यात याना मदत करायला आपली प्रशासकीय यंत्रणा,आपले राजकारणी आणि लाचार स्थानिक लोकप्रतिंधी.आतापर्यंत अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.अगदी बलात्कारचासुद्धा गुन्हा आहे.त्याने एकदा विधानसभेची अपक्ष निवडणूकसुद्धा लढवली.यातून लक्षात येते की याना फक्त पैसा नको तर सत्ताकेंद्रेसुद्धा ताब्यात हवीत.
भिंडे याच्याबद्दल एकही अशी माहिती आली नाही की,त्याने कुठल्या शाळेला मदत केली किंवा काही गरीब विद्यार्थ्यांची फि भरली.एक काळ होता जेंव्हा गुजराती समाज आपले या राज्याविषयी कृतज्ञ होण्यासाठी निदान पाणपोई बांधायचा.पण आत तेसुद्धा करत नाही.इथे कमवायचे आणि आपल्या मातृराज्यात सेवाकार्य करायचे अशी माजोरी यांच्यात कुठून आणि कशी आली ते पुढील भागात.
आपला महाराष्ट्र डिजीटल हे व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करा.
लेखक-अॅड. मनोज वैद्य.