*बहूजनांची लेक “सुजाता सौनिक”महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी विराजमान.!* ( तात्यासाहेब सोनवणे यांजकडून ०७ जुलै २०२४) *राकट, कणखर, महाराष्ट्र.! बलिदानाचा त्यागाचा, हुतात्म्यांचा महाराष्ट्र .! राष्ट्रसंत तुकाराम महाराज,गाडगेबाबा,तुकडोजी महाराज, संत गोरा कुंभार,संत सावतामाळी संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर “माऊली” चा.! “शिव-शाहू-फुले -आंबेडकर” “स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ,” “क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले”, “त्यागमूर्ती रमाई,” “अहिल्यादेवी होळकर”,”प्रबोधनकार ठाकरे”, “पंजाबराव देशमुख,” “कर्मवीर भाऊराव पाटील”, स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्राफ , स्वामी रामानंद तीर्थ,कवी कुसुमाग्रज,वसंत बापट, प्र.के.अत्रे, आचार्य विनोबा भावे,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पद्मश्री नारायणदादा सुर्वे, मधू दंडवते ,कॉम्रेड डांगे,सानेगुरुजी, श्यामाप्रसाद मुखर्जी,भाई वैद्य,मृणालताई गोरे,बाबा आढाव, पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने,सिंधुताई सपकाळ,शरद जोशी, भारतरत्न लता दीदी, भारतरत्न मधू मंगेश कर्णिक,भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा , शेतकरी शेतमजूर,कामगारांचा , श्रमिकांचा,महाराष्ट्र,” जय जय जय महाराष्ट्र.! वास्तव सत्याला जीव लावणा-यांचा महाराष्ट्र.!”आदरणीय सुजाता सौनिक” ही,सी.डी.चीमा”, पंजाब ,यांची सुकन्या होय. बहूजनांची लेक, महाराष्ट्र राज्याच्या सनदी अधिकारी अर्थात पहिल्या वहिल्या महिला मुख्यसचिव Maharashtra first Female chief secretary म्हणून विराजमान झाल्या. “सुजाता अर्थात ताईसाहेब”,प्रथम महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने आपले खूप खूप अभिनंदन.!*
*या अगोदर “रत्नाकर* *गायकवाड” हे इस.सन.१९९५ काळात मुख्यसचिव म्हणून नियुक्त केले होते.बहूजनांची अस्मिता पायदळी तुडवत वादग्रस्त कर्तव्य बजावल्यामुळे बहूजनांच्या रोषाला ते बळी पडले.*
*ब्रिटिश राजवटीच्या काळात संविधानाचे शिल्पकार मानव मुक्तीचे प्रणेते “डॉ .बाबासाहेब आंबेडकर”*
*यांनी ज्या ३३ विद्यार्थ्यांना* *परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी साठी पाठवले होते. त्यात अनुसूचीत जातीचे दोन विद्यार्थ्यांचे पाल्य आयएएस (IAS)महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव या पदावर विराजमान होऊ शकले. रत्नाकर गायकवाड नंतर “सन्मानित सुजाता* *सौनिक”, “ताईसाहेब”.! प्रज्ञासूर्य*
*डॉ. बाबासाहेब यांची दूरदृष्टी*
*आणि शिक्षणाचे त्यांनी* *ओळखलेले महत्त्व आज मितीला अधोरेखित करणे आम्हाला नव्या पिढीला गरजेचे वाटते.*
*आपली माणसं राजकारण व अर्थकारणात तुलनेने मागे भलेही असतील, बहूजनांनी ऐंशीच्या दशकानंतर गरुड झेप घेतली आहे. ती जागतिक इतिहासात नोंद करण्यासारखी आहे. केवळ घटनेने दिलेल्या “आरक्षणामुळे प्रगती झालेली नसून ,”*शिका”, संघटित* *व्हा ,संघर्ष करा.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर “यांनी सांगितेल्या तत्वज्ञानाचा अंगिकार केल्याने आज मितीला,कित्येकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झालेला आहे.*
*शिका, म्हणजे केवळ पदवीधर (Degree) असं नाही, तर सुशिक्षित व्हा. सत्य जाणा, अंधश्रद्धेला कवटाळू नका.! स्वकष्टाने मिळवलेला पैसा, जीवन आधारातून चरितार्थ चालवत ,वाचलेला पैसा शिक्षणासाठी खर्च करा.* *फक्त बार्टी आणि सारथी करू नका.*
*आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या इतर जाती समाज बांधवांनी जर क्रांतिसूर्य डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश ऐकला असता, तर तेही असेच कार्यप्रवीण झाले असते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घ्या, त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान आत्मसात केले म्हणून पंजाबमध्ये सरकार आले.झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिवंगत रामविलास पासवान, विद्यमान खासदार डॉ.काळगे सर ,भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद टायगर खासदार झाले.अखिल भारतीय दलित साहित्य अकादमी अध्यक्ष डॉ.सुमनाक्षर यांना वाचा.त्यांना आत्मसात करा.डाॅ.नरेंद्र जाधव , डॉ.भालचंद्र मुणगेकर, डॉ.सुखदेव थोरात, उत्तम कांबळे सर, यांनी अपार कष्टाने उंची वाढवली.*
*अजूनही वेळ गेलेली नाही, जोपर्यंत “शिव-शाहू- फुले, आंबेडकर “यांचे विचार आपण स्विकारात नाही. तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. ते स्वीकारायचे की नाही हे आपल्या हाती आहे.*
*”सन्मानित सुजाता ताईसाहेब,” भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना आज सत्तासंघर्षात आपल्या समोर अनेक आव्हाने आहेत. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” ख-या लाभार्थ्यांना मिळण्यासाठी लक्ष द्यावे लागेल, अंगणवाडी सेविकांकडे वर्ग करण्याऐवजी शहरी भागात “आशा वर्कर” महिला भगिनीकडे वर्ग केले तर ,आज तुडुंब गर्दी व भल्या मोठ्या प्रमाणावरच्या रांगा लागल्या नसत्या असे आम्हाला वाटते.महिला आर्थिक विकास महामंडळाला,भरीव आर्थिक तरतूद करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल, राज्य महिला आयोगाच्या अधिकार कक्षा रुंदावण्यासाठी लक्ष द्यावे लागेल, आयोगाने चौकशी नोटीस बजावली तरी शासकिय टेबलावरचा कागद अनास्थेमुळे निकाली निघत नाही.”महिला विकास व बालकल्याण” विभागात दखल द्यावी लागेल.पंतप्रधान मातृवंदन योजनेच्या इस.सन.२०२२/२३च्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही.प्राथमीक आरोग्य केंद्रात महिला डॉक्टरांची नियुक्ती केली तर वैद्यकीय क्षेत्रातील महिला वैद्यकीय अधिकारी यांनाही न्याय मिळेल.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे कापड, ठरावीक बचत गटांना न देता, काही महिला बचत गटांना देवून प्रोत्साहीत केले तर, रोजगाराच्या संधी शोधत असलेल्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील महिलांना न्याय मिळेल.एकात्मिक महिला बालकल्याण विकास योजने अंतर्गत आदिवासी भगिनी “सबल” नाही परंतू स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. जव्हार,मोखाडा,विक्रमगड, गडचिरोली, मेळघाटातील कुपोषीत बालकांकडे लक्ष द्यावे लागेल.महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समिती मध्ये एखादी महिला असावी पदाधिकारी, किमान सदस्य असावी, बलात्कार, अन्याय अत्याचारासारख्या घटना काही अंशी कमी होतील.”मुलगी वाचवा” राष्ट्रीय जनजागृती अभियान राबविण्यात यावे.गर्भलिंग चिकित्सा बंदी कठोर राबवावी.आज पुरूषांपेक्षा महिला जननदर खूप तफावत आहे.”ताईसाहेब” आपण कायद्याच्या अभ्यासक आहात याची आम्हाला जाणीव आहेच,पण शासकीय योजना कागदावर नांदू नये,असे लोकमत सांगते.आमच्या सारख्या सामाजिक उत्थानासाठी अहोरात्र धडपडणा-या समाजसेवकाचं आर्जव आहे . महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला मुख्य सचिवपदी आपण विराजमान झालात याबद्दल आम्हाला हेवा वाटतो. शुभेच्छांचा निमित्ताने उजागर केले.GO AHEAD Hon. SUJATA SAUNIK MADAM.!*
@ *समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे , +९३२४३६६७०९*
