समृद्धी बाधित आदिवासींसाठी रिपाइं मैदनात; आदिवासींचे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

ठाणे  : उपोषणाला बसलेल्या सहा कुटुंबीयांची ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात शेतजमीन होती. समृद्धी महामार्ग मध्ये सरकारने हे जमीन ताब्यात घेतली आहे. या दुकानात अनेक जमिनीचा मोबदला देण्यात आलेला नाही. त्यामध्ये आमचाही समावेश असल्याचा दावा उपोषणाला बसलेल्या कान्हू सोंगाळ, जैतू भोगरा, लखा वाघ, एकनाथ भला, देवकाबाई सोंगाळ, देवराम भळणानी ध्रुपता तेलम यांनी केला. या सहाही कुटुंबांची शहापूर तालुक्यातील वाशाळा, फुगाळे, कसारा, शेलवली, खुटघर येथे वन हक्क शेतजमीन होती. ती जमीन समृध्दी महामार्गाच्या कामात शासनाने संपादित केली; मात्र या आदिवासी कुटुंबीयांना अद्याप त्यांच्या जमिनीचा मोबदला दिलेला नाही. हा मोबदला त्वरित मिळावी अथवा त्यांची जमीन त्यांना परत मिळावी अशी मागणी या आदिवासी पीडित कुटुंबीयांनी शासनाकडे केली आहे.

यासाठी अनेक वर्ष ते मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय, एमआरडीसी विभाग यांच्याकडे अनेक फेऱ्या मारलेल्या आहेत; मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे जिवंत असे पर्यंत न्याय मिळत नाही तर जगून काय फायदा, असा सवाल उपस्थित करीत या कुटुंबीयांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी शासकीय विश्राम गृहासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. भर पावसात हे उपोषण सुरू असून जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा ठाम निर्धार उपोषणकर्त्यांनी बोलून दाखवला आहे. दरम्यान ठाणे जिल्हा रिपाइंचे अध्यक्ष भास्कर वाघमारे, महासचिव प्रमोद इंगळे यांनी या उपोषणाला भेट देऊन त्यांना पाठिंबा व्यक्त आहे. उपोषणकर्त्यांच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

Leave a Comment

× How can I help you?