बेलापुरमध्ये तीन मजली इमारत कोसळली; दोघांना बाहेर काढण्यात यश

नवी मुंबई : बेलापूर येथील शहाबाज गावात तीन मजल्यांची इमारत पहाटेच्या सुमारास कोसळली आहे. अचानक इमारत जमीनदोस्त झाल्याने आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली आहे. इमारत कोसळल्यानंतर सुरुवातीला अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, त्यानंतर ढिगाऱ्याखाली तिघेजण अडकल्याची माहिती समोर आली. त्यातील दोघांना सुरक्षितपणे बाहेर काढले गेले आणि उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. बचाव पथक शर्थीचे प्रयत्न कत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाला सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. इतर सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. इमारतीला हादरे बसण्यास सुरुवात होताच ३७ नागरिक सुखरुप बाहेर पडले.

“आम्हाला पहाटे ४.५० वाजता इमारत कोसळल्याचा फोन आला. २ जणांना वाचवण्यात यश आले आहे. दोन जण अडकले असण्याची शक्यता आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे,” अशी माहिती नवी मुंबईचे अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी दिली. “पहाटे च्या सुमारास इमारत कोसळली. ही तळमजला अधिक तीन मजले अशी इमारत आहे. दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे आणि दोघे अडकले असण्याची शक्यता आहे. एनडीआरएफ घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे,” अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी दिली.

Leave a Comment

× How can I help you?