*इथे कष्ट कुणाचेच काही नाही.ही तू़झीच कमाई आहे ग् रमाई.!* (२७ में २०२५) *Rembering the mother of millions of oppressed लाखो पिडितांच्या आईची आठवण करतानां.. हंबरून आलं.! तशी माझी जन्मदात्री सीतामाय(आक्का )आज हयात नाही.! तीनंही बहिणाबाई चौधरी सारखं रमाईला खोप्यातली चीत्तरकथा सांधली असती.! अमावस्येला लागलेले सूर्यग्रहण जगाने अनेकदा पाहिले आहे . पण अमवस्या नसतानाही खग्रास सूर्यग्रहण कोणी पाहिले आहे…? होय आमच्या पूर्वजांनी पाहिले आहे .*
*इस.सन.२७ में १९३५,दादर मुंबई नव्वद वर्षांपूर्वी ..या दिवशी मानवमुक्तीचे प्रणेते संविधानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथा “साहेबांची रामू ” गेली.अन् शोषित,पिडीत, समाजाचे जग अंधारात बुडाले.! क्रांतिसूर्य भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांगातीने या जगाचा अकाली निरोप घेतला.! अन् खरं सांगू? हरेक अश्रूंच्या थेंबाचं मोल जाणणा-या साक्षात “सूर्यालाही”, “रामूच्या” निधनानंतर रडू कोसळले…!निरोप घेण्यापूर्वी रमाबाईंनी साहेबांचा हात आपल्या थरथरत्या हातात घेऊन डॉ .बाबासाहेबांना म्हणाल्या, “साहेब “, राजरत्न, इंदू, रमेश आपली मूलं दगावली .हे खरं असलं तरी माझ्या नऊ कोटी लेकरांवर लक्ष ठेवा. त्यांची काळजी घ्या. त्यांना मानसन्मान मिळेल याच्याकडे जरूर लक्ष द्या बस,हेच अंतिम शब्द होते त्यागमूर्ती रमाबाईंचे, साहेबांच्या. “रामूचे” !कुवत नसताना ज्या माऊलीने शेवटच्या श्वासापर्यंत केवळ देण्याचे काम केले, ती आज आपल्याला काही मागत आहे , हे ऐकून पाषाणालाही पाझर फुटला असता. ते तर “रामूचे” साहेब होते ! डॉ.बाबासाहेब ओक्साबोक्सी रडले. पण विचलित झाले नाहीत.! ‘तेथील’ सूर्याला इथल्या सूर्याने सह्रदय सांगूनच ठेवले होते.तू तिथला सूर्य तर मी इथला सूर्य आहे.तू ,ता-यांना प्रकाशमान कर मी सा-यांना प्रकाशमान करतो.*
*डॉ.भीमराव तथा बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शब्दाला जागले.इतकच काय? रात्रीचे दिवस करून अंधा-या वस्त्यांवर दिवे लावले ! या संघर्षाच्या काळात “प्रिय रामू” तथा रमाबाईंची डॉ.बाबासाहेबांना समर्थ साथ मिळाली नसती तर .. अशी कल्पनाही करवत नाही.सांकेतीक परिभाषेत अर्थात गणितामध्ये ०१+०१= ०२ होतात. नव्हे? ही साधी बेरीजच ! पण येथे ०१+०१ =११ झाले. यातच त्यागमूर्ती रमाबाईंचे महात्म्य दडले आहे.*
*स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर, महामानवाच्या सहजीवनाच्या आधारस्तंभाला रामूला, आमच्या मातेला , अभिवादन करताना कंठ कोणाचा दाटून येणार नाही ? येणारच. !बस,एकच करू या. इथे कुणाचेच काही कष्ट नाही.ही तुझीच कमाई आहे गं रमाई.!” ह्या दोन ओळी कायम मन-मस्तिष्कात घेऊन आपण या दांपत्याचे देणे लागतो, न फिटणारे उपकार आहेत त्याचे आपल्यावर याची नम्र जाणीव ठेवत वाटचाल करू या…! “जयभीम साहेब”.! या क्रांतिकारी ना-याचा उदंड स्वाभिमान चेतवताना, सामाजिक उत्थानासाठी अहोरात्र धडपडणा-या डेलीकेट भीमसैनिकांना पाठबळ देवू या.कारण तोच आपली मुलंबाळं, मायबाप,बायको सोडून अन्याय अत्याचाराविरूध्द रस्त्यावर उतरून आंदोलन मोर्चात सहभागी होतो.पोलिसांच्या लाठ्याकाठ्या स्वतःच्या पाठीवर झेलतो.झेलमध्ये जातो.प्रसंगी सोमनाथ सुर्यवंशीसारखा संविधानाच्या चौकटीत न्याय मागणारा सत्तापिपासूंकडून बळी जातो.नंतर मेणबत्या ,मूकमोर्चे लाखोंचे ..? भावांनो, भगिनींनो मानवमुक्तीचे प्रणेते संविधानाचे शिल्पकार भारतरत्न Fix Deposit वर मिळणाऱ्या Intrest मधून वीस टक्के हिस्सा मातीत मळलेल्यांना उचलून घेण्यासाठी खर्च करू या.तथागत गौतम बुद्धाची दान पारमिता काय सांगते? डॉ.बाबासाहेब आंबेडकर बुद्धाला शरण गेले.त्याच्या धम्माला शरण गेले.अन् सगळयात महत्त्वाचं संघ् शरणम् गच्चामी.! तेव्हा तुम्ही आम्ही कोण.? विकले जावू नका . मोठ्या हुद्द्यावरच्या भावंडांनी मागे वळून पाहायला हवं..! अन् २०% राजकीय अभिनिवेश बाजूला सारून माझी बहिण,माझा भाऊ पिडीत आहे.आर्थिक पिचलेला आहे, त्याला मदतीचा हात द्या.नाहीतर साहेब, म्हणालेच होते.शिकल्या सवरलेल्यांनी मला जास्त धोका दिला.मातृत्वाला नीळा सलाम करताना आपण मन-मस्तिष्कात कायमस्वरूपी कोरून ठेवा, आपण रडगाणे न गाता, आपल्याच भावंडांची हेटाळणी न करता संविधान सन्मान गौरवाचा अमृतमहोत्सव साजरा होताना एकच करा.भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत.आमचे आदर्श यशवंत मनोहर यांच्या “रमाई” पुस्तकात डॉ.भीमराव तथा बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनहून रमाईला ३० डिसेंबर १९३० रोजी लिहिलेले पत्र वाचा. अभ्यासा .. फक्त प्रिय रामू..एवढं भावनिक नसून, त्यागमूर्ती रमाईच्या प्रती आदरर्भाव जपताना, देशातील शोषित वंचिताच्या उत्थानासाठी सत्यशोधकी कार्याची ओळख करून देताना,आपला संसार उद्धवस्त झाल्याची घटना न सांगता, राजरत्न, इंदू ,रमेश लेकरं दगावली.”रामू ” पण नवकोटींचा उद्धार कसा होईल यासाठी पराकाष्ठा करावी लागणार नाही का?रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची..! इथे कष्ट कोणाचेही काही नाही,ही तूझीच कमाई आहे ग् रमाई.!आईसाहेब भावपूर्ण अभिवादन!*
*@ समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे महाराष्ट्र शासन+ ९३२४३६६७०९*
इथे कष्ट कुणाचेच काही नाही.ही तू़झीच कमाई आहे ग् रमाई
Post Views: 454
Recent Posts
महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुका पुढे ढकलण्यामागचे खरे कारण
December 3, 2025
No Comments
‘नंबर’च्या हव्यासाने कोट्यवधींचे खेळ…
December 2, 2025
No Comments
लक्ष्य सेनच्या विजयानं भारतीय बॅडमिंटनला दिली नवसंजीवनी
November 28, 2025
No Comments
वन नॉर्थ इस्ट : फुटीरतेच्या काळात एकपक्षीय प्रयोगाची नवी चाहूल
November 27, 2025
No Comments
आपण देश विसरण्याची सवय लावून घेतोय का?
November 27, 2025
No Comments


