विडियो न्यूज

वेब स्टोरी

वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

ठाणे मराठी साहित्य मंचाची ‘पहिला पाऊस’ काव्यस्पर्धा

ठाणे : ठाणे मराठी साहित्य मंच यांच्या वतीने ‘पहिला पाऊस’ या विषयावर काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यप्रेमी आणि नवोदित कवींना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी या स्पर्धेमुळे उपलब्ध होणार आहे.

स्पर्धेसाठी पाठवण्यात येणाऱ्या कविता या पूर्णपणे स्वरचित असणे आवश्यक असून इच्छुक स्पर्धकांनी आपल्या कविता tmsmthane26@gmail.com या ईमेलवर ३ जून २०२६ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन आयोजकांच्या वतीने ऍड. मनोज वैद्य यांनी केले आहे.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास रु. ७००/- रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी रु. ५००/- व प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकासाठी रु. ३००/- आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

स्पर्धेचा निकाल २१ जून २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार असून, काव्यरसिकांनी आणि कवींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन ठाणे मराठी साहित्य मंच यांच्या वतीने मनोज वैद्य यांनी केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें