स्त्रियांच्या भावनांचा पत्ता माहीत असलेला ‘ लापता लेडीज’

लापता लेडीज

 

एक अतिशय छान आणि वेगळ कथानक असलेला, एकही ओळखीचा किंवा ग्लॅमराईज्ड चेहरा नसलेला तरीही उत्तम अभिनय केलेला असा हा चित्रपट म्हणजे लापता लेडीज . लग्न करून रेल्वे च्या एकाच डब्यात बसलेली २ जोडपी पण गावातून आल्यामुळे परंपरेप्रमाणे घुंघट खूप लांब पर्यंत ओढलेला , साडीचा रंग दोघींचाही लाल आणि त्यामुळे एक दुल्हन दुसरीच्या नवऱ्यासोबत जाते (जिला खरं तर नंतर कळतं पण आपल्या नवऱ्याने पहिल्या बायकोला जाळून मारल्याच्या बातम्या ऐकल्यामुळे आणि तिला पुढे शिकण्याची जबरदस्त इच्छा असल्यामुळे ह्या संधीचा ती उपयोग करायच ठरवते ) आणि दुसरी दुल्हन स्टेशनवर नवऱ्याची वाट बघत राहते. नवरा येईपर्यंत एक म्हातारी तिला फूड स्टॉलवर काम करायची संधी देते आणि राहायला तिच घर देते). स्टेशन वर राहते ती फूल आणि दुसरी जिला शेतीमध्ये शिक्षण घ्यायचं असतं ती जया. अतिशय सुंदर कथानक, काही भोळी माणसं, त्यांची माणुसकी, गावातली पोलीस चौकी, त्यातील आधी बिलंदर वाटलेला आणि पैशासाठी काहीही करु शकतो अस सुरवातीला वाटलेला पण चांगल्या माणसांसाठी मदतीला, दानव पण येतो हा विश्वास देणारा पोलीस, स्वतः प्रॉब्लेम मध्ये असतानाही जया, दीपकला म्हणजे ज्याच्याकडे ती चुकून येते त्या फूलच्या नवऱ्याला आपल्या फुलसाठी कासावीस झालेला पाहून दीपक च्या प्रिंटर मित्राकडून एक लीफलेट बनवून घेते. ज्यात ती दिपकच्या वहिनी कडून (जिने फुलला लग्नात पाहिलं असत आणि तिचं पैंटिंग खूप छान असतं ) फूलचं पेंटिंग करून त्या लीफलेट मध्ये छापते आणि त्यावर स्वतःचा लपवलेला मोबाइल नं सम्पर्क म्हणून देते. आणि जवळपासच्या गावात पाठवते.

मग फूल मिळते का? जयाला तिच्या शिक्षणासाठी जायला मिळतं का? कि तिचा खरा, वाईट नवरा तिला पोलिसांकडून घेऊन जातो? लपून छपून जयाचे स्वतःच्या लग्नातील तिच्या जवळ असलेलं थोडं सोनं विकून पैसे मनी ऑर्डर ने पाठवण्याच्या व्यवहारावरून तिचं काहीतरी बाहेर लफडं आहे असं समजणाऱ्या पोलिसांना तिचा खरा चेहेरा कळतो का ? ह्यासाठी सध्याच्या अनेक चित्रपटांच्या मांदियाळीत अतिशय वेगळा ठरलेला किरण राव दिग्दर्शित आणि ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजे, आमिर खान आणि किरण राव ह्यांची निर्मिती असलेला एक निरागस चित्रपट म्हणजे ‘लापता लेडीज’ नेटफ्लिक्स वर जरूर बघा.

 

गावाचं चित्रीकरण बघितलं आणि तिथली साधी माणसं बघितली, कि खरंच अशा एखाद्या गावात जाऊन ४ दिवस राहून यावं असं नक्कीच वाटेल. आत्ताच्या ह्या व्यावहारिक जगात आता अशी माणसं तोंडी लावणीपुरती सुद्धा राहिली नाहीयेत. थोड्या वेळासाठी आपल्याला अशा शुद्ध, साध्या जगात चेहऱ्यावर खुद्कन हसू आणणाऱ्या आणि कोणतेही स्ट्रेस नसलेल्या अशा वातावरणात नेण्यासाठी ह्या चित्रपटाला माझ्याकडून १००/१०० मार्क्स. ह्यातील सहज सुंदर संवाद आणि शांत पण अर्थपूर्ण गाणी आणि नात्यांचा सुंदर गोफ विणणारी कथा हे ह्या चित्रपटाचं आकर्षण आहे.

 

चित्रपटाचं नाव ‘लापता लेडीज’ असलं तरी स्त्रियांच्या भावनांचा बरोब्बर पत्ता माहित असलेला आणि त्यांना आयुष्याच्या योग्य पत्त्यावर आणून सोडत असेलेला, सुंदर संदेश देणारा हा चित्रपट जरूर जरूर बघा.

मुग्धा सागर फाटक

Leave a Comment

× How can I help you?