इंद्रायणी नदीला प्रदूषणाचे ग्रहण, प्रशासनाचं दुर्लक्ष

इंद्रायणी नदीला प्रदूषणाचे ग्रहण, प्रशासनाचं दुर्लक्ष

वारकरी बांधवांनी वारंवार या नदी प्रदूषणात संदर्भात आवाज उठवला आहे. संसदेच्या अधिवेशनामध्येही  इंद्रायणी नदी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

 

कैवल चक्रवर्ती साम्राज्य माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा 193 वा पालखी प्रस्थान सोहळा, अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपला आहे. तर दुसरीकडे लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. पुन्हा इंद्रायणी नदीमध्ये बर्फासारखं फेसाळलेलं पाणी आढळून आलं आहे. गेल्या दहा वर्षांपासून या इंद्रायणी नदी प्रदूषणाचा प्रश्न प्रलंबित असून सुटायचं नाव घेत नाही. 

वारकरी बांधवांनी वारंवार या नदी प्रदूषणात संदर्भात आवाज उठवला आहे. संसदेच्या अधिवेशनामध्येही  इंद्रायणी नदी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. राज्याच्या विधिमंडळामध्ये सुद्धा या इंद्राणीच्या नदी प्रदूषणाबाबत चर्चा झाली. मात्र परिस्थिती अद्यापही जैसे थेच आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी याठिकाणी आले, त्यांनी पाहणी केली. नदीच्या पाण्याचे नमुने देखील तपासणे आणि नदीतील पाणी हे प्रदूषित असल्याचे त्यांनी जाहीर देखील केले. मात्र याबाबत काही ठोस पाऊले उचलली जात नाहीत. या इंद्रायणी नदी काठी असलेल्या औद्योगिक कारखान्यांमध्ये रसायन मिश्रित पाणी नदीपात्रात सोडले जाते. त्या रसायनामुळेच या नदीपात्रामध्ये फेस निर्माण होतो. नदीतील बायोकेमिकल ऑक्सिजनची मात्रा ही  30 पेक्षा अधिक असल्याचं निदर्शनात आले आहे. 

Leave a Comment

× How can I help you?