केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची एकनाथ खडसे यांनी दिल्लीत घेतली भेट; राज्यात मिळणार `मोठी जबाबदारी’

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची एकनाथ खडसे यांनी दिल्लीत घेतली भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिल्लीत भेट घेतली. यावेळी केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती होती. गेल्या काही दिवसांपासून खडसे यांच्या भाजप प्रवेशाची आणि महाराष्ट्र भाजपातील ‘ परिवर्तनाची’ चर्चा सुरु आहे. त्यामुळे या भेटीला वेगळे महत्त्व आहे.

महाराष्ट्रामधील लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला मोठा फटका बसला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतल्यानेच भाजपचे राज्यात खच्चीकरण झाल्याची भावना पक्ष कार्यकर्त्यांमध्ये पसरली आहे. त्यामुळेच प्रदेश कार्यकारिणीत मोठे बदल करण्याचे सूतोवाच दिल्लीतील नेत्यांनी दिले आहेत. दरम्यान, भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. याबाबत राजकीय जाणकार आपापले अर्थ काढत आहेत. यामागे अनेक राजकीय गणिते समजली जात आहेत. आता एकनाथ खडसे यांना स्वगृही आणून त्यांच्यावर ‘ मोठी जबादारी’ सोपविण्याचा विचार दिल्लीतील नेते करत आहेत.
राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी रक्षा खडसे यांचा प्रचार करुन त्यांना निवडून आणले. त्यानंतर त्यांच्या प्रवेशाला चर्चेला उधाण आले आहे. आगोदर दिल्लीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याची चर्चा झाली. त्यामुळे आता त्यांचा भाजप प्रवेश केव्हा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

× How can I help you?