आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त् ठाणे महानगरपालिका व अंबिका योगाश्रम ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दादोजी कोंडदेव क्रिडाप्रेक्षागृह येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
https://whatsapp.com/channel/0029VafQmTqFi8xVHXQUvP2R
आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त श्री अंबिका योगाधामचे सचिव विनायक देसाई यांनी योगाचे आपल्या जीवनाशी असलेले महत्व व त्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित असलेल्या योगशिक्षकांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना योगचे प्रात्याक्षिक करुन दाखवित ते उपस्थितांकडून करुन घेतले.
यावेळी उपायुक्त मीनल पालांडे, ठाणे जिल्हा व शहर बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव श्रीकांत वाडा, ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव अशोक आहेर, अंबिका योगाधामचे सचिव विनायक देसाई, योग शिक्षक मनोहर वारंग, मनिषा सुर्वे, योगसाधक सचिन साळवी, सरिता भोईर, वैशाली साळवी, संध्या भोईर उपस्थित होते.
Follow us on:
Youtube ?
https://youtube.com/@aaplamaharashtradigital?si=Sq2wldxokb1Ck9lN
आपला महाराष्ट्र डिजिटल
संपादक.- अॅड. मनोज वैद्य
लेख,बातम्यांसाठी आणि जाहिरातीसाठी!
संपर्क-+91 78755 51192