आरक्षणाच्या नावाखाली जन्माला आला आणखी एक लढवय्या ‘योद्धा’
ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये साठी गेल्या दहा दिवसापासून प्राध्यापक लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको ही त्यांची प्रमुख मागणी आहे. सर्वसामान्य धनगर कुटुंबात जन्मलेला मुलगा ते ओबीसी नेता असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे. निवडणुकीच्या आखाड्यात यश आले नाही तरी हरकत नाही, समाजासाठी झटक राहाणार अशी त्यांची भूमीका राहीली आहे. धनगराचा पोरगा ते प्राध्यापक आणि नंतर ओबीसींचा नेता असा प्रवास लक्ष्मण हाकेंचा राहीला आहे.
शिव -शाहू फुले -आंबेडकर यांचा महाराष्ट्र राकट कणखर, नेतृत्वाचा! येथे भाईचारा गुण्यागोविंदाने नांदत होता.त्याकाळी, महागाई, बेरोजगारी शेतकरी शेतमजूर औद्योगिक विकासात, शेतकरी, कामगार नेते तयार झाले.लोकाधिकार समिती, रेल्वे मजदूर युनियनच्या माध्यमातून श्रमिकांच्या वेदना बोलक्यांनी उजागर केल्या. आज केंद्र शासनाने बहुतांश रेल्वे, एअरपोर्ट,नेव्ही, वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, कामगार शोषितांच्या “आस्थापना”, खाजगी मालकीच्या केल्या.दिवंगत शरद जोशी, स्वर्गीय दि.बा.पाटील, दत्ता सामंत,दादा सामंत,गोविंदराव आदिक,भाई कांबळे,राव,मा.खा.राजू शेट्टी,पाशा पटेल, सदाभाऊ खोत, रविंद्र तुपकर, लढले .लढत आहेत.समाजवाद कागदावर राहिला.काही भांडवलदार मुजोर झाले.कामगार देशोधडीला लागले.शासकीय कायद्याचे जी.आर.ॲण्टीचे़बरमधून निघू लागले.महागाई, बेरोजगारीमुळे देशात आत्महत्या वाढल्या.यातूनच आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला.मराठा, धनगर, मुस्लिम संघटनेने,उचल खाल्ली.शासनाने ठोस भूमिका न घेतल्याने मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण, आंदोलन,मुक मोर्चातून रान पेटवले.आयोग, समिती, अहवाल, म्हणजे वेळकाढूपणाच नाही का? काही मागण्या मान्य केल्या.कायद्याच्या चौकटीत राहूनच .,!पण सरसकट? सर्वोच्च न्यायालयात न टिकणा-या मागण्या सर्वच मनासारखं कसं घडेल.! याच मुद्यावरचं भांडण मराठा विरुद्ध ओबीसी लागले.परिचित नसलेले भटक्या विमुक्त ओबीसी चळवळीत कार्यरत “प्रा. लक्ष्मण हाके “,अचानक News maker बनले. ‘आरक्षणा’ने आणखी एक लढवय्या ‘योद्धा’ जन्माला घातला अशी चर्चा सुरू झाली आहे…
आंदोलनातून पुढे आलेल्या नेत्यांची यादी खूप मोठी आहे. आजच्या तारखेत ती यादी अद्ययावत केली गेली तर त्या यादीत प्रा .लक्ष्मण हाके यांच्या नावाचा निश्चितपणे विचार करावा लागेल असं वाटतं.
खरं तर हाकेंविषयी मलाही फारसं माहीत नव्हतं. पण मागील एक आठवड्यापासून कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला हा माणूस दिवसेंदिवस मनात घर करत चालला आहे. संविधानावरील बावनकशी निष्ठा, सखोल अभ्यास, सामाजिक व्याकरणाची जाण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुच्छ कर दिखाने का जज़बा भावला मला. मानव मुक्तीचे प्रणेते परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तरी लोकांनी कुठं निवडून दिले.तरीही त्यांनी समाजाला न्याय दिला.त्यामुळे सामाजिक उत्थानासाठी ओबीसींच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जालन्याच्या वडगोद्री याठिकाणी उपोषण सुरू केले आहे.
मराठा बांधव आणि ओबीसी बांधवांच्या आरक्षणाचा मुद्दा सध्या शासन दरबारात असून त्यावर अधिक भाष्य न करता आम्ही एवढेच म्हणू शकतो प्रा.लक्ष्मण हाके सारख्या संघर्षयोध्द्याचे सामाजिक निरपेक्ष योगदान समाज उदार अंतःकरणाने अधोरेखित करतोच करतो!
जयभीम. जय संविधान .!
@ समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे,
महाराष्ट्र शासन, अध्यक्ष रूग्णहक संघर्ष समिती, जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स, सोशल मीडिया
ठाणे जिल्हा. ९३२४३६६७०९