सोमवारी, 24 जून रोजी रिक्षाचालकांनी राज्यभरात आंदोलन पुकारलं आहे. वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास आकारल्या जाणाऱ्या शुल्काविरोधात रिक्षाचालकांनी संताप व्यक्त केला. कोरोना काळात रिक्षाचालकांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. यानंतर वाहन योग्यता प्रमाणपत्र वैधता संपलेल्या तारखेपासून 50 रूपये प्रतिदिवस याप्रमाणे विलंब शुल्क आकारण्यात येत आहे. याविरोधात रिक्षाचालक-मालक संघटना कृती समितीच्या नेतृत्वाखाली सोमवारी शांततामय आंदोलन करण्यात येणार आहे.
