लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर जिल्ह्यासह समर्थकांमध्ये नाराजीची लाट होती. काही समर्थांनी नैराश्येतून टोकाचे निर्णय देखील घेतले. यानंतर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्या, असे माजी आमदार सुरेश धस म्हणाले होते. दरम्यान आता पंकजा मुंडे समर्थकांनी केलेल्या मागणीमुळे भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे यांचे तात्काळ राजकीय पुनर्वसन करावे अशी मागणी केली आहे. बीड तालूक्यातील सानपवाडीचे ग्रामस्थ यासाठी आक्रमक झाले आहेत. विधानसभेपूर्वी याबाबतचा निर्णय झाला नाही, तर भाजपला मतदान करणार नाही, असा पवित्राच या ग्रामस्थांनी घेतला.
यासंदर्भात एक बैठक देखील झाली असून या बैठकीत हा ठराव घेण्यात आला. आता यावर भाजप काय निर्णय घेते आणि पंकजा मुंडे यांना कशा पद्धतीने संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. अशा पद्धतीचा निर्णय न झाल्यास भाजपला काही मतदारसंघांमध्ये पंकजा मुंडे यांच्या समर्थकांच्या या पद्धतीच्या रोशाला सामोरे जावे लागणार आहे.
पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होईपर्यंत भाजपला मतदान नाही; बीडमधील गावाचा निर्धार
Post Views: 207
Recent Posts
महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुका पुढे ढकलण्यामागचे खरे कारण
December 3, 2025
No Comments
‘नंबर’च्या हव्यासाने कोट्यवधींचे खेळ…
December 2, 2025
No Comments
लक्ष्य सेनच्या विजयानं भारतीय बॅडमिंटनला दिली नवसंजीवनी
November 28, 2025
No Comments
वन नॉर्थ इस्ट : फुटीरतेच्या काळात एकपक्षीय प्रयोगाची नवी चाहूल
November 27, 2025
No Comments
आपण देश विसरण्याची सवय लावून घेतोय का?
November 27, 2025
No Comments


