ठाणे, दि. २४ – दिव्य श्री तारा माँ यांनी श्री माँ ट्रस्टच्या माध्यमातून १९७५ साली कोपरी येथे स्थापन केलेल्या श्री माँ बालनिकेतन हायस्कूल आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. यानिमित्त वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. रविवार, २३ जून २०२४ रोजी शाळेच्या परिसरातील जेष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
आरोग्य शिबीरात सामान्य तपासणी, इ.सी.जी., नेत्र तपासणी, बी.एम. डी., हाडांचे आणि दातांचे विकार, उपचार इत्यादी विविध सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या.
शिबीरात तज्ञ डॉक्टर डॉ. सुंदर कृष्णन, डॉ. उदय गाडगीळ, डॉ. सुबोध मेहता, डॉ. न्याशा, डॉ. जय लालवाणी, डॉ. प्रांजली जोशी, डॉ. रितू छाबरा, डॉ. प्रतिमा शर्मा, डॉ. आनंद शर्मा, डॉ. उदय खोना, डॉ. आर.एन.सुद या ठाणे शहरातील सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. आरोग्य शिबिरात माजी विद्यार्थ्यांचाही सहभाग होता.