ठाणे (25) : ठाणे शहरातील विविध भागात सिंगल यूज प्लॅस्टिकबंदीबाबत कारवाई सुरू आहे. महाराष्ट्र प्रदुषण कंट्रोल बोर्ड व ठाणे महानगरपालिका प्रदुषण विभागाच्यावतीने सदरची कारवाई सुरू असून आज माजिवडा मानपाडा प्रभागसमितीअंतर्गत सिंगल यूज प्लॅस्टिकबंदी विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 9.5 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. विविध दुकाने व आस्थापनांना दिलेल्या भेटीत एकूण 22 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला.
तर वर्तकनगर प्रभागसमितीअंतर्गत करण्यात आलेल्या सिंगल यूज प्लॅस्टिक बंदी कारवाईत 12.5 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. तर विविध दुकाने व आस्थापनांना दिलेल्या भेटीत 16500/- रुपये दंड वसूल करण्यात आला.
या दोन्ही कारवाईत एकूण 22 किलो प्रतिबंधीत प्लॅस्टिक जप्त करुन 39000 हजार रु. इतका दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती महापालिकेकच्या प्रदुषण विभागाने दिली. ठाणे महापालिकेच्या विविध प्रभागसमितीअंतर्गत प्रतिबंधीत प्लॅस्टिकबंदी कारवाई सुरूच राहणार असल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी नमूद केले.