‘पोर्शे’तून काहीच धडा नाही; पुण्यात 14 वर्षीय मुलाने टँकर चालवून महिलेसह काही मुलांना उडविले

‘पोर्शे’तून काहीच धडा नाही;
पुण्यात 14 वर्षीय मुलाने टँकर चालवून महिलेसह काही मुलांना उडविले

पुणे : पुण्यातील वानवडी येथे झालेल्या अपघातात महिलेसह काही मुले जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अपघातग्रस्त टँकर 14 वर्षीय मुलगा चालवत होता.

पुण्यामध्ये कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणानंतरही अनेक गंभीर दुर्घटना घडत आहेत. पण स्थानिकांकडून सररास नियम धाब्यावर बसवून कायदा हाती घेण्याचे प्रकार सुरूच आहेत. अवघ्या 14 वर्षीय मुलाच्या ताब्यामध्ये अवजड टँकर दिल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर स्थानिकांनी या अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
सकाळच्या सुमारास वानवडी येथे व्यायामासाठी बाहेर पडलेल्या काही मुलांसह बाइकस्वार महिलेला एका भरधाव टँकरने धडक दिल्याची घटना घडली. सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या दुर्घटनेत महिलेसह काही मुले जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अपघातग्रस्त टँकर केवळ 14 वर्षीय मुलगा चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या या मुलाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
बाइकवरून महापालिकेचे अधिकारी संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी प्रवास करत होते. त्यांच्या तालमीतच शिकणारी मुले रस्त्याच्या शेजारी धावण्याचा व्यायाम करत होते. यादरम्यान भरधाव टँकरची बाइकला धडक बसताच त्यांची पत्नी वाहनावरून उडल्या आणि रस्त्यावर पडल्या. तर टँकरखाली दोन मुली सापडल्या. स्वतः ढुमे यांनी या मुलींना कसेबसे बाहेर काढले. दरम्यान या दुर्घटनेबाबत स्थानिकांकडून तीव्र संपात व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment

× How can I help you?