लेखन माणसाला आत्मनिर्भर बनविते – नमिता कीर
ठाणे : लेखन माणसाला आपल्या आतल्या ‘मी’ चा शोध घेऊन आत्मबळ देते आणि आत्मनिर्भर बनविते. आजच्या ज्या तीन सत्कारमूर्ती आहेत, त्यांच्यातीळ लिखाणाच्या सवयीमुळेच त्या समाजासमोर व्यक्त होऊ शकल्या,असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी केले. निमित्त होते कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे जिल्हा महिला समिती आणि शारदा एज्युकेशन ट्रस्ट यांचे वतीने ‘ती…. चा सन्मान या कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात, दक्षिण आफ्रिकेतील किलोमांजारो हे जगातले पाचव्या क्रमांकाचे शिखर काबीज करणाऱ्या पहिल्या महिला हा मान मिळवणाऱ्या अमृता भालेराव, ठाण्याच्या डेप्युटी कमिशनर आणि कवयित्री व गायिका रुपाली अंबूरे मॅडम आणि अंध बँक कर्मचारी व अंध व्यक्तींसाठी भरघोस कार्य करणाऱ्या अनुजा संखे या मान्यवर महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून तन्वी हर्बल्सच्या डॉ. मेधा मेहेंदळे, शरद एज्युकेशन ट्रस्टच्या डॉ. विधीता लिखिते, कोमसापचे जिल्हा अध्यक्ष बाळ कांदळकर, महिला समिती अध्यक्ष नितल वढावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
नमिता कीर आपलय मनोगतात पुढे म्हणाल्या, आज आपण ज्या तिघींचा सन्मान करतो आहोत, त्यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. कसे जगावे हा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे, तो आपण शिकला पाहिजे. त्यांची जिद्द , कठोर परिश्रम आपण अंगीकारले पाहिजेत आणि त्यांच्या प्रमाणे स्वतःला घडविण्याच्या प्रयत्न केला पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा अध्यक्ष बाळ कांदळकर यांनी अमृता भालेराव, रुपाली अंबूरे आणि अनुजा संखे यांच्या प्रेरणादायी प्रवासाचे कौतुक केले. तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तर तुम्ही कुठलेही शिखर सहज पार करू शकता असे कांदळकर यांनी सनीतले.
आपले मनोगत व्यक्त करताना रुपाली अंबुरे यांनी आजोबांनी लावलेल्या वाचनाच्या सवयीमुळेच मी आज इथवर पोहोचले आहे, असे सांगितले. अमेरिकेला एम.एस. करण्यासाठी जायची संधी मिळून सुद्धा एमपीएससी होऊन पोलीस दलात सेवा करण्याला दिलेले प्राधान्य आणि गुन्ह्यांचा तपास करताना आलेले अनुभव सांगितले.
किलीमांजरी हे दक्षिण आफ्रिकेतील शिखर काबीज करणारी पहिली महिला अमृता भालेराव यांनी उणे दहा इतके तापमान असताना , कोरोनासारख्या विषम परिस्थितीमध्ये अनेक संकटांवर मात करून शिखर कसे काबीज केले हे रोमांचकारी अनुभव कथन केले. तर अंध बँक अधिकारी अनुजा संखे यांनी आपल्याला आलेले अंधत्व आणि त्यावर मात करून घेतलेले शिक्षण, बँक अधिकारी होण्याचा प्रवास , विविध प्रकारचे लेखन व पुस्तक प्रकाशन असा आपला विविधांगी प्रवास करताना शारीरिक अपंगत्व कसे मध्ये आले नाही हे सांगून उपस्थितांना एक नवी दृष्टी दिली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या तन्वी हर्बलच्या डॉ. मेधा मेहेंदळे यांनी आपल्या मनोगतात या कार्यक्रमाचा उल्लेख साहित्याची भूक वाढविणारा कार्यक्रम असा करून संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तपस्वी नेवे यांनी केले तर कोमसाप ठाणे जिल्हा महिला प्रमुख नितल वढावकर यांनी आभार प्रदर्शन केले.
पाहुण्यांचा परिचय प्रा. मनीषा राजपूत आणि संध्या लगड यांनी करून दिला तर राजश्री डोईफोडे , अजित महाडकर , डॉ योगेश जोशी, निशिकांत महांकाळ , सुनील बडगुजर आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.