पेपरफुटी विरोधात महविकास आघाडीच्या आमदारांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

पेपरफुटी विरोधात महविकास आघाडीच्या आमदारांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

मुंबई : राज्यात झालेल्या विविध पेपरफुटी विरोधात महविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. पेपरफुटी विरोधात कठोर कायदा झालाच पाहिजे, ही मागणी केली.

तर सभागृहातही विरोधी पक्षांनी ही मागणी पेपरफुटी प्रकरणाचा मुद्दा उपस्थितीत केला. आमदार रोहित पवार यांनी राज्यात पेपरफुटीमुळे युवांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे अन् राज्याचे गृहमंत्री सभागृहात म्हणतात की पेपरफुटीचे खोटे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय… म्हणजे आज राज्यातील ३५-५० लाख युवा खोटं बोलत आहेत का? पेपरच फुटले नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय का? नेमकं गृहमंत्री फडणवीस साहेब तुम्ही कुणाला वाचवण्यासाठी खोटं बोलत आहात? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं राज्यातील युवा तुमच्याकडे मागणारच….. आम्ही युवांसोबत आहोत… काहीही झालं तरी या अधिवेशनात पेपरफुटी विरोधात कठोर कायदा करावाच लागेल असे सांगितले.

Leave a Comment

× How can I help you?