ठाण्यातील जांभळीनाका बाजारपेठेतील ८० ते ९० वर्ष जुन्या इमारतीचा भाग रविवारी कोसळला. ही इमारत रिकामी असल्याने दुर्घटना टळली. सुरक्षेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी इमारतीजवळ धोकापट्टी बांधली आहे.
जांभळीनाका येथील कडवा गल्ली परिसरात ८० ते ९० वर्ष जुनी अतिधोकादायक दुमजली इमारत आहे. या इमारत कोणीही वास्तव्यास नव्हते. रविवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास इमारतीचा जीर्ण झालेला भाग अचानक कोसळला. घटनेची माहिती ठाणे महापालिकेला मिळाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.