व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडन येथे असणाऱ्या वेगवेगळ्या वाघ नखांपैकी एक वाघनख राज्य सरकार भारतात आणत आहे. तीन वर्षांकरिता ही वाघनखं भाडेतत्त्वावर आणल्या जात आहेत. मात्र मूळ वाघनखं महाराष्ट्रात असतानाही सरकार विनाकारण खर्च करण्याचा अट्टाहास का करत आहे असा सवाल सावंत यांनी केला.सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे असल्याचं वारंवार सांगितलं आहे. त्या संदर्भातला सरकारनं निर्णय देखील जारी केलेला आहे. मात्र या वाघनखं मूळ वाघनखं नाहीत असा सावंत यांचा दावा आहे.
महाराजांची मूळ वाघनखं सातारा येथील राजघराण्याकडे असल्याचही सावंत यांनी सांगितले. त्यामुळे सरकार आणत असलेली ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाही, त्याबाबत माझ्याकडं पुरावे असल्याचं सावंत यांनी ठामपणे सांगितलं. पुरातत्व संचलनालयाचे तत्कालीन संचालक तेजस गर्गे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री यांना याबाबत पत्रव्यवहार देखील केलेला आहे. याच आशयाचे पत्र मुख्यमंत्र्यांना देखील पाठवलं आहे.मात्र या गंभीर विषयाबाबत सरकारची उदासीनता दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केलं.
या वाघनखांची प्रतिकृती महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी शासन करोडो रुपयांच्या निधीची उधळपट्टी करणार आहे. हे संपूर्ण कामाची जबाबदारी तेजस गर्गे यांच्या निरीक्षणाखाली सुरू होती. मात्र गर्दी लाच घेतल्यामुळे मे महिन्यापासून निलंबित आहेत. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी सध्या सुरू आहे. ही संपूर्ण परिस्थिती पाहता शिवप्रेमींची फसवणूक सुरू असल्याचं सावंत यावेळी म्हणाले.